Honda CB200X : 184.4 cc इंजिनसह होंडाने लाँच केली दमदार Bike; किंमत किती पहा

टाइम्स मराठी । प्रसिद्ध टू व्हीलर निर्माता कंपनी होंडाने नवीन बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक OBD2 नियमानुसार लॉन्च करण्यात आली आहे. Honda CB200X असं या आकर्षक बाईकचे नाव असून कंपनीने 146,999 रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. तुम्ही ही बाईक रेड विंग डीलरशिप वर जाऊन प्री बुक करू शकता. आज आपण या गाडीचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

डिझाईन आणि फीचर्स

CB200X या बाईकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. या बाईक मध्ये देण्यात आलेली डिझाईन पूर्णपणे CB500X सोबत मिळते जुळती आहे. यामध्ये LED लाइटिंग देण्यात आलेली असून न्यू असिस्ट आणि स्लीपर क्लच, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सल, नक्कल गार्ड माउंटेड एलईडी टर्न सिग्नल, यूएसडी टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क यामध्ये देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन– Honda CB200X

CB200X या बाईकमध्ये 184.4 cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 8500 आरपीएम वर 17 बीएचपी पावर आणि 6000 आरपीएम वर 15.9 पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये देण्यात आलेल्या इंजिन सोबत 6 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहे. यासोबतच USD फ्रंट फोर्क्स आणि रियर मध्ये मोनोशोक उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

CB200X यामध्ये बरेच सेंसर देण्यात आले आहे. जर तुमच्या बाईक मध्ये काही खराबी असेल तर हे सेंसर पॅनलवर अलर्ट नोटिफिकेशन जारी करते. त्याचबरोबर बाईक रायडरची सुरक्षा वाढवण्यासाठी यामध्ये सिंगल चैनल एबीएस, ड्युअल पेटल डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. एवढेच नाही तर यामध्ये नवीन असिस्ट आणि स्लीपर क्लच उपलब्ध आहे, जेणेकरून गिअर शिफ्टिंग साठी मदत होते. यामध्ये एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल देण्यात आले आहे. होंडाच्या या बाइकमध्ये स्पीडोमीटर ओडोमीटर, टेकोमीटर, इंधन गेज, दुहेरी ट्रिप मीटर, बॅटरी वोल्टमीटर, गिअर सिच्युएशन आणि वॉच यांसाखे फीचरही मिळतात. देण्यात आले आहे.