Honda ने लाँच केल्या 2 दमदार Bikes; 348 cc इंजिन, किंमत किती?

टाइम्स मराठी । Honda कंपनीच्या गाड्या भारतात खूप प्रसिद्ध आहे. होंडा सातत्याने ग्राहकांची मागणी पाहता अपडेटेड फीचर्स सह नवनवीन गाड्या बाजारात आणत असते. आताही कंपनीने Honda CB350 आणि Honda CB350RS या दोन्ही बाईकचे नवीन स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही जर फेस्टिवल सीजन मध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही लेटेस्ट लॉन्च झालेली नवीन बाईक अप्रतिम ठरेल. या बाईकची बुकिंग डिलिव्हरी लवकरच संपूर्ण देशामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आज आपण या दोन्ही गाड्यांचे फीचर्स आणि किमती जाणून घेऊयात.

   

लूक आणि इंजिन –

Honda CB350 आणि Honda CB350RS या स्पेशल एडिशन बाईक नवीन पल सायरन ब्ल्यू कलर स्कीम मध्ये डेव्हलप करण्यात आल्या आहे. त्यानुसार यामध्ये नवीन बॉडी ग्राफिक्स उपलब्ध असून लिगेसी एडिशन बेंज देखील उपलब्ध आहे. हे स्पोर्ट रेड आणि ऍथलेटिक ब्लू मेटॅलिक पेंट स्कीम मध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर यामध्ये बॉडी कलर रियर ग्रॅब हँडल आणि हेडलाईट कव्हर देखील देण्यात आले आहे. दोन्ही बाईक मध्ये 348.36 cc चे 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, BS-VI, OBD2 इंजिन देण्यात आले होते. हे इंजिन एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीने सुसज्ज असून इंजिन 20.7 बीएचपी पावर आणि 30 NM पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

अन्य फीचर्स –

Honda CB350 आणि Honda CB350RS या दोन्ही स्पेशल एडिशन बाईकमध्ये ऑल LED लाइटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. म्हणजेच या सिस्टीम मध्ये गोल LED हेडलॅम्प, LED विंकर्स, एलईडी टेललॅम्प उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच  दोन्ही स्पेशल एडिशन बाईक मध्ये स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम, ॲडव्हान्स डिजिटल एनालॉक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेट्रो बाईक असिस्ट स्लीपर क्लच, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल HSTC सिस्टीम देण्यात आली आहे.

किंमत किती?

Honda CB350 ची किंमत 2,16,356 रुपये एवढी आहे तर Honda CB350RS ची किंमत 2,19,357 रुपये आहे.