Honda CB350 : भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या 350cc बाईक्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. 350 CC इंजिन असलेल्या बाईक्स म्हणजेच रॉयल एनफिल्ड, बुलेट, क्लासिक, हंटर 350. या बाईक्स मोठ्या इंजिन सह उपलब्ध असून ग्राहकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात पडतात. आता भारतात रॉयल एनफिल्ड ला टक्कर देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपनी Honda ने नवीन बाईक लॉन्च केली आहे. Honda CB350 असे या बाईकचे नाव असून आज आपण या गाडीचे फीचर्स आणि किंमत जाणून घेणार आहोत.
स्पेसिफिकेशन
होंडा CB350 मध्ये कंपनीने 348.36 cc सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 20.8 bHP पावर आणि 29.4 nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज असून यासोबतच स्लीपर आणि असिस्ट क्लच ऑफर करण्यात आला आहे. होंडाने ही आकर्षक अशी स्पोर्ट बाईक दोन व्हेरियंट लॉन्च केले आहे. Honda CB350 Delux आणि Honda CB350 Pro अशी या दोन्ही व्हेरिएंटची नावे आहेत.
फिचर्स– Honda CB350
Honda CB350 मध्ये कंपनीने ब्लूटूथ सपोर्ट सह, स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम HSVCS, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, ड्युअल चॅनल ABS, 18 इंच व्हील, यासारखे ऍडव्हान्स फीचर्स उपलब्ध केले आहे. याशिवाय LED लाइटिंग, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, डबल लेयर एक्झॉस्ट या बाईक मध्ये देण्यात आले आहे. या बाईकचे सायलेन्सर नोट अत्यंत बेसिक आहे. यामध्ये क्लासिक 350 प्रमाणे आवाज देण्यात आला आहे. या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, क्लासिक 350 प्रमाणेच कंपनीने ही नवीन बाईक डिझाईन केली आहे. होंडा कंपनीची ही बाईक सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 सोबत प्रतिस्पर्धा करेल . यासोबतच हंटर 350, बुलेट 350 ला देखील ही बाईक टक्कर देते.
किंमत किती
Honda च्या या बाईकच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर Honda CB350 डिलक्स व्हेरिएंटची किंमत, 1,99,900 रुपये एवढी आहे. आणि डीलक्स प्रो या व्हेरिएंटची किंमत 2,17,800 रुपये एवढी आहे. तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, होंडाच्या बिगविंग डीलरशिप च्या माध्यमातून खरेदी करू शकता. सध्या या बाईकची बुकिंग सुरू करण्यात आली असून लवकरच बाईकची डिलिव्हरी करण्यात येईल.