Honda च्या गाड्यांवर 73000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या लाभ

टाइम्स मराठी | भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा (Honda). ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होंडा कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना होंडा कंपनीच्या सर्व कार वर सूट देण्यात येत आहे. होंडाच्या अमेझ, सिटी, city e HEV यासह सर्व कारचा समावेश यामध्ये होतो. या कार्सवर फक्त सूट नाही तर कंपनीकडून 10000 रुपयांचा ॲक्सेसरीज रिप्लेसमेंट ऑफर देखील देण्यात आलेले आहे. याशिवाय ग्राहक रॉयल्टी बोनस म्हणून 12,296 रुपये आणि 5000 ते 6000 पर्यंत कॉर्पोरेट सूट मिळवू शकतात. चला तर जाणून घेऊया होंडाच्या कोणत्या गाडीवर नेमकी किती रुपयांची सूट आहे.

   
images 7

1) Honda City-

होंडा सिटी या कार मध्ये पेट्रोल इंजिन देण्यात आलेले असून यामध्ये 7 वेगवेगळे व्हेरिएंट आणि कलर ऑप्शन देण्यात आले आहे. होंडा सिटी चा टॉप व्हेरियंटमध्ये चार सिलेंडर 1498cc इंजिन देण्यात आलेला आहे. ही कार 18.4 kmpl मायलेज देते. होंडा सिटी या कारवर 73000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर या कार वर 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 10,946 किमतीच्या ॲक्सेसरीज देखील बदलून देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर ग्राहकांच्या लॉयल्टीसाठी होंडा सिटीवर 5000 आणि 30000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. यासह 8000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 20000 रुपयांची विशेष कॉर्पोरेट सूट देखील या कारवर दिली जात आहे.

images 6

2) City e:HEV-

या कारमध्ये होंडा सीसिंग टेक्नॉलॉजी देण्यात आलेली असून 1.5 लिटर, चार सिलेंडर, Atkinson Cycle पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स कम्बाईन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 124 बीएचपी मॅक्झिमम पावर आणि 253nm टॉर्च जनरेट करते. होंडाची ही कार 26.5 Kmpl मायलेज देते. या कारवर 40000 रुपयांची रोख सवलत उपलब्ध असून ही ऑफर फक्त V वेरियंट वर उपलब्ध करण्यात आली आहे. City e:HEV या मॉडेलच्या टॉप स्पेक ZX या वेरियंट वर कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही.

images 5

3)Honda Elevate-

Honda Elevate या कारमध्ये 1498cc इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजन 121Hp आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे. Honda Elevate या कारच्या Elevate C – segment SUV ची किंमत सप्टेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. Honda Elevate ही कार hundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyrider, Skoda Kushaq, Volkswagen Tigun आणि MG Aster या कार सोबत स्पर्धा करते.