Honda Dio 125 फक्त 10 हजारात घरी घेऊन जा; पहा काय आहे ऑफर?

टाइम्स मराठी (Honda Dio 125) । वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे मार्केट मध्ये गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरची जास्त चलती आहे. बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावले. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल गाड्या बंद पडतात की काय अशी भीती वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात होंडा कंपनीची ही नवीन Dio 125 स्कूटर लॉन्च करण्यात आली होती. आता या स्कुटर वर भारतीय बाजारात बंपर ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही देखील ही स्कुटर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही फक्त 10 हजारात घरी घेऊन जाऊ शकता.

   

काय आहे ऑफर –

होंडा कंपनीची ही Dio 125 या स्कूटर ची (Honda Dio 125) एक्स शोरूम किंमत 83,400 रुपये एवढी आहे. आणि सर्व प्रोसेस करून 96,392 रुपयात मिळेल. आता कंपनीने आणलेल्या जबरदस्त फायनान्स प्लॅन मुळे तुम्ही ही Dio 125 स्कुटर 10000 रुपयांच्या डाऊन पेमेंट वर घरी घेऊन जाऊ शकतात. होंडा कंपनीची Dio 125 खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला ऑनलाईन डाऊन पेमेंट आणि ईएमआयनुसार 9.7 टक्के वार्षिक व्याजदराने बँकेकडून 86,392 रुपयांचे कर्ज मिळू शकते. बँकेकडून तुम्हाला तीन वर्षासाठी हे कर्ज दिले जाते. त्यानंतर 10,000 रुपये तुम्हाला कंपनीकडे डाऊन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. त्याचबरोबर ईएमआयद्वारे दर महिन्याला 2775 महिना भरून तुम्ही कर्जफेड करू शकता.

Honda Dio 125 चे फीचर्स- (Honda Dio 125)

Honda Dio 125 या स्कूटरच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर ही स्कूटर स्पोर्टी लुक देते. स्कूटरमध्ये Honda Enhanced Smart Power (ESP) 124 cc OB2-मानक PGM-FI इंजिन देण्यात आलेले असून ही सायलेंट स्टार्ट होते. त्याचबरोबर यामध्ये 18 लिटर एवढी स्टोरेज कॅपॅसिटी आहे. तसेच या डिओ स्कूटरमध्ये 12 इंचचा फ्रंट व्हील, टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि थ्री स्टेप ऍडजेस्टेबल रियल सस्पेन देण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स 171mm आणि ब्रेक इक्वलायझर यासोबतच कॉम्बि ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे.

या होंडा Dio 125 स्कूटरमध्ये स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट, स्मार्टकी हे वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. ही स्मार्ट की ECU आणि स्मार्ट की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयडी म्हणून काम करते, ज्यामुळे चोरी होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर यामध्ये एच-स्मार्ट व्हेरियंटमध्ये लॉक मॉड ऑप्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे विना की 5 इन 1 फंक्शन चा वापर करू शकतो. यात लॉक हँडल, इग्निशन ऑफ, फ्युएल लिड ओपन, सीट ओपन आणि इग्निशन ऑन यासारखे फिचर्स देण्यात आलेले आहे. त्यासोबतच या स्कूटरला देण्यात आलेले हेड लॅम्प आणि ड्युअल आउटलेट मफलरसह क्रोम कव्हर आकर्षक दिसतात. त्याचबरोबर यामध्ये स्पोर्टी एक्झॉस्ट नवीन स्प्लिट ग्रॅब रेल, 12-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन इंटेरियर, वेव्ह डिस्क ब्रेक देण्यात आला आहेत. ही स्कुटर होंडाच्या पहिल्या डीओ स्कूटर पेक्षा आकर्षक दिसते.

या होंडा डिओ 125 स्कूटरमध्ये डिजिटल मीटर देण्यात आलेले असून या डिजिटल मीटर मध्ये ट्रिप, घड्याळ, साइड स्टँड इंडिकेटर, स्मार्ट की आणि बॅटरी इंडिकेटर, ईसीओ इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर दाखवण्यात आलेले आहे. यासोबतच या स्कूटरमध्ये समोरच्या साईडला पॉकेट, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम, पासिंग स्विच देण्यात आलेले आहे. होंडा कंपनीची ही Dio 125 ही स्कूटर 7 रंगांच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पर्ल सायरन ब्लू, पर्ल नाईट स्टार ब्लॅक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, मॅट ऍक्सिस ग्रे मेटॅलिक, स्पोर्ट्स रेड आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक या रंगांचा समावेश आहे.