Honda Dio 125 अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

टाइम्स मराठी । Honda ने आपली प्रसिद्ध स्कूटर Honda Dio 125 अपडेटेड फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह नव्याने लाँच केली आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली होंडा डिओ भारतीय बाजारात TVS, आणि Hero च्या स्कुटरला जोरदार टक्कर देईल. कंपनीने आपल्या अपडेटेड होंडा Dio 125 ची किंमत स्टॅंडर्ड वेरिएंट साठी 83,400 रुपये आणि स्मार्ट वेरिएंटसाठी 91,300 रुपये ठेवली आहे. आज आपण या स्कुटरची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

   

लूक आणि डिझाईन –

Honda Dio 125 चा लूक हा अतिशय स्पोर्टी असून देशभरातील तरुणाईला या लूकची चांगलीच भुरळ पडेल यात शंका नाही. स्कूटरच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर या स्कूटरला देण्यात आलेले हेड लॅम्प आणि ड्युअल आउटलेट मफलरसह क्रोम कव्हर आकर्षक दिसतात. त्याचबरोबर यामध्ये स्पोर्टी एक्झॉस्ट नवीन स्प्लिट ग्रॅब रेल, 12-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन इंटेरियर, वेव्ह डिस्क ब्रेक देण्यात आला आहेत. स्कूटरमध्ये समोरच्या साईडला पॉकेट, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम, पासिंग स्विच देण्यात आलेले आहे. ही स्कुटर होंडाच्या पहिल्या डीओ स्कूटर पेक्षा DIO 125 आकर्षक दिसते.

इंजिन – Honda Dio 125

या Honda Dio 125 स्कूटरमध्ये Honda Enhanced Smart Power (ESP) 124 cc OB2-मानक PGM-FI इंजिन देण्यात आलेले असून ही स्कुटर सायलेंट स्टार्ट होते. या डिओ स्कूटरमध्ये 12 इंच चा फ्रंट व्हील, टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि थ्री स्टेप ऍडजेस्टेबल रियल सस्पेन देण्यात आले आहे. त्याचबरोबर स्कुटरला 171mm चा ग्राउंड क्लिअरन्स आणि ब्रेक इक्वलायझर यासोबतच कॉम्बि ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे.

अन्य फीचर्स –

या होंडा Dio 125 स्कूटरमध्ये स्मार्ट फाइंड, स्मार्ट अनलॉक, स्मार्ट स्टार्ट, स्मार्टकी हे वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. ही स्मार्ट की ECU आणि स्मार्ट की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयडी म्हणून काम करते, ज्यामुळे चोरी होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर यामध्ये एच-स्मार्ट व्हेरियंटमध्ये लॉक मॉड ऑप्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे विना की 5 इन 1 फंक्शन चा वापर करू शकतो. यात लॉक हँडल, इग्निशन ऑफ, फ्युएल लिड ओपन, सीट ओपन आणि इग्निशन ऑन यासारखे फिचर्स देण्यात आलेले आहे. तसेच यामध्ये डिजिटल मीटर देण्यात आलेले असून या डिजिटल मीटर मध्ये ट्रिप, घड्याळ, साइड स्टँड इंडिकेटर, स्मार्ट की आणि बॅटरी इंडिकेटर, ईसीओ इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटर दाखवण्यात आलेले आहे.

किंमत किती ?

होंडा Dio 125 ची किंमत स्टॅंडर्ड वेरिएंट साठी 83,400 रुपये आणि स्मार्ट वेरिएंटसाठी 91,300 रुपये आहे. तुम्हाला हि स्कुटर पर्ल सायरन ब्लू, बर्ल डीप ग्राउंड ग्रे, पर्ल नाईट स्टार ब्लॅक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट संगरिया रेड मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या कलर मध्ये खरेदी करता येईल. कंपनी या स्कूटरवर दहा वर्षाची वॉरंटी देत आहे. त्यामध्ये 3 वर्षांची आणि 7 वर्षांची वैकल्पिक विस्तारित वॉरंटी दिली जाईल.