Honda Elevate SUV भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये होंडा कंपनीची नवीन Honda Elevate SUV लॉन्च करण्यात आली आहे. होंडा कंपनीची ही एलिवेट SUV हे हुंडाई क्रेटा, कीआ सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टाइगुन यासारख्या भारतीय बाजारपेठेमध्ये स्वतःचे वर्चस्व गाजवणाऱ्या कार सोबत मुकाबला करणार आहे.

   

Honda Elevate SUV या कारची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने या कारचे चार व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यात SV, V, VX, ZX हे व्हेरिएंटचा समावेश आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16 लाख रुपये एवढी आहे. ही SUV कार दहा कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये 7 सिंगल आणि 3 ड्युअल कलरचा समावेश असून सर्व कार्सचे रूफ ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आहेत. यात गोल्डन ब्राऊन, ऑब्सीडियन ब्ल्यू , लुनर सिल्वर , मेटेरॉईड ग्रे सिंगल टोन, रेडियन रेड, फिनिक्स ऑरेंज , प्लॅटिनम व्हाईट मोनो टोन ड्युअल कलर ऑप्शन देण्यात आले आहे.

स्पेसिफिकेशन

Honda Elevate SUV मध्ये 1.5 लिटर 4 सिलेंडर VTEC पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 121 PS पावर प्रदान करते. आणि 145 nm पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये देण्यात आलेल्या इंजिनला सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन CVT ऑटोमॅटिक युनिटने जोडण्यात आले आहे. कारच्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर , हायवेवर या कारचे मायलेज 16 ते 17 किलोमीटर पर लिटर एवढे आहे. त्याचबरोबर सिटी मध्ये 12 ते 13 किलोमीटर पर लिटर इतकं मायलेज आहे.

फीचर्स– Honda Elevate SUV

Honda Elevate SUV या कार मध्ये 10. 25 इंच फ्लोटिंग टच स्किन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. त्याचबरोबर ADAS बेस्ट ड्राईव्ह असिस्टिव, 8 स्पीकर 6 एअर बॅग सेफ्टी टेक्नॉलॉजी यासह होंडाच्या सेन्सिंग सुटसारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध आहे.

Honda Elevate SV फीचर्स

Honda Elevate SV ट्रिम, या व्हेरिएंटमध्ये 16 इंच स्टील व्हील, एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट, टेल लाईट, ड्युअल फ्रंट एअर बॅग, पुश बटन इंजिन स्टार्टअप, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग सिस्टीम, बेज फॅब्रिक अपहोल्स्ट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. होंडा एलिवेट च्या V ट्रिम आणि SV या दोघांच्या तुलनेमध्ये SV मध्ये जास्त फीचर्स देण्यात आले आहे.

Honda Elevate V फीचर्स

Honda Elevate V या व्हेरीएंट मध्ये वायरलेस एप्पल कार प्ले , अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सह 8इंच टच स्क्रीन इम्पोर्टेन्ट सिस्टीम, इन कार कनेक्टेड टेक्नॉलॉजी, 4 स्पीकर ऑडिओ, एक मल्टी फंक्शनल स्टिअरिंग व्हील, रिवर्स पार्किंग कॅमेरा, यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Honda Elevate VX फीचर्स

Honda Elevate VX ट्रिममध्ये 6 स्पीकर, सात इंच चे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, वायरलेस चार्जिंग सुविधा, एलईडी फोग लाईट, सिंगल पेन सनरुफ, 17 इंच अलोय व्हील, इलेक्ट्रिकल फोल्डेबल, ORVMs आणि लेन वॉच कॅमेरा हे फीचर्स देण्यात आले आहे.

Honda Elevate ZX फीचर्स

Honda Elevate ZX मध्ये 10.25 इंच फ्लोटिंग टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8 स्पीकर, ब्राउन लेदर अपहोल्स्ट्री, ऑटोडीमिंग आणि डे नाईट IRVM, सॉफ्ट टच डॅशबोर्ड फिनिश, ADAS बेस्ट ड्राईव्हर असिस्टीव, 6 एअर बॅग आणि सेफ्टी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Honda Elevate SUV क्रॅश टेस्ट

होंडा कंपनीने या Honda Elevate SUV ची सेफ्टी रेटिंग लॉन्च केली आहे. परंतु अजूनही अधिकारीक सेफ्टी स्टार रेटिंग लॉन्च करण्यात आले नाही. कंपनीने इन हाऊस रिपोर्ट मध्ये वेगवेगळे क्रॅश टेस्ट आयोजित केले आहेत. यामध्ये 64 किलोमीटर प्रति तास क्रॅश टेस्ट, 50 किलोमीटर प्रति तास साईड मोविंग बेअरिंग टेस्ट, 50 किलोमीटर प्रति तास फ्लॅट बियरिंग टेस्ट, 32 किलोमीटर प्रति तास साईड फोन इम्पॅक्ट टेस्ट, 50 किलोमीटर प्रति तास रियर मोविंग बेरिंग टेस्ट, चाइल्ड डमी यासह 64 किलोमीटर प्रति घंटा पर फ्रंट टेस्ट यांचा समावेश आहे. कंपनीच्या मते एलिमेंट सर्व टेस्ट अप्रतिम सुरक्षा प्रदान केली आहे.