Honda Hornet 2.0 : होंडाची Hornet नव्या अवतारात लाँच; दमदार इंजिन अन आकर्षण लूक तरुणांना करणार घायाळ

टाइम्स मराठी । होंडा Motorcycle India ने नुकतीच भारतात लेटेस्ट टू व्हीलर लॉन्च केली आहे. या बाईक चं नाव Honda Hornet 2.0 आहे. यापूर्वीच्या होंडा होर्नेटपेक्षा या नव्याने लाँच झालेल्या बाईकमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेली Honda Hornet 2.0 तरुणांना चांगलीच भुरळ पडेल यात शंका नाही.

   

डिझाईन आणि लूक

Honda Hornet 2.0 या कंपनीच्या नवीन बाईकमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. या बाईक मध्ये एलईडी हेडलाईट, शार्प बॉडी पॅनेल, मस्कुलर फ्युयल टॅंक देण्यात आले आहे. यासोबतच नवीन ग्राफिक्स देखील या बाईकला आकर्षक लूक देतो. एवढेच नाही तर या बाईकमध्ये एलईडी हेडलाईट सोबत टेललॅम्प आणि इंडिकेटर एलईडी देण्यात आले आहे. यासोबतच होंडाच्या या नव्या हॉर्नट मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये गिअरचे स्टेटस देखील दिसू शकतात . भारतात ही बाईक TVS Apache RTR 180 ला जोरदार टक्कर देईल.

इंजिन पॉवर – Honda Hornet 2.0

Honda Hornet 2.0 या बाईकमध्ये होंडा हॉर्नेटच्या जुन्या मॉडेल मध्ये असलेल्या इंजिन ऐवजी नवीन इंजिन वापरण्यात आले आहे. त्यानुसार बाईक मध्ये पाच स्पीड गिअर बॉक्ससह 184.4cc सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8500rpm वर 17bhp पावर आणि 6000rpm वर 15.9nm पीक टॉर्क जनरेट करते. होंडा होर्नेट 2.0 या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन BS6 फेज-2 यानुसार तयार करण्यात आले आहे. एवढेच नाही तर यामध्ये OBD2 इंजिन सह नवीन असिस्ट आणि स्लीपर क्लच देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

किंमत आणि वॉरंटी ऑफर

भारतात Honda Hornet 2.0 या बाईकची बुकिंग सुरू करण्यात आलेली असून या बाईकची किंमत थोडी जास्त आहे. भारतामध्ये ही किंमत 1.39 लाख रुपये एवढी आहे. जर तुम्हाला देखील ही बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या डीलरशिप कडून बाईकचे बुकिंग करू शकता. सध्या या बाईकची डिलिव्हरी सुरू करण्यात आलेली नसून तुम्ही प्री बुकिंग करू शकतात. यासोबतच कंपनीने Honda Hornet 2.0 वर १० वर्षांची वॉरंटी दिली आहे. यामध्ये तीन वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी तर सात वर्षांपर्यंत एक्स्ट्रा वॉरंटी असेल.