Honda ने लाँच केली दमदार Bike; Hero, Bajaj चा खेळ बिघडवणार

टाइम्स मराठी । Hero आणि Bajaj कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Honda कंपनीने Livo ची नवीन अपडेटेड आवृत्ती लॉन्च केली आहे. होंडा कंपनीच्या या livo मध्ये नवीन ग्राफिक्स उपलब्ध असल्यामुळे पहिल्या लिवो पेक्षाही आकर्षक दिसते. ही बाईक ड्रम आणि डिस्क या दोन वेरियंट उपलब्ध आहे. नवीन होंडा लिवो ची ड्रम वेरियंट किंमत 78,500 रुपये असून डिस्क वेरियंटची किंमत 82,500 रुपये आहे.

   

इंजन पावर आणि गिअरबॉक्स

Honda Livo ही बाईक 110 cc सेगमेंट मधली सर्वात उत्कृष्ट बाइक आहे. यामध्ये 109cc क्षमता असलेले OBD2 कम्पलायंट इंजन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 8.67 बीएचपी पावर आणि 9.30 NM पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच इंजिन मध्ये फ्युल इंजेक्शन आणि सायलेंट स्टार्ट ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. ही बाईक स्टार्ट करताना कमीत कमी आवाज येतो. यासोबतच या टेक्नॉलॉजीमुळे या बाईकचा परफॉर्मन्स आणि मायलेज देखील सुधारते. या बाईकच्या इंजिनमध्ये 4 स्पीड युनिट गिअरबॉक्स देण्यात आलेले आहे.

फिचर

Honda Livo या बाईक मध्ये 18 इंचचे अलॉय व्हील देण्यात आले असून फ्रंटला टेलिस्कोपिक फार्क, मागच्या साईडने ड्युअल स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे. एवढेच नाही तर दोन्ही चाकांमध्ये स्टॅंडर्ड ड्रम ब्रेक्स उपलब्ध आहे.यासोबतच या बाईकच्या हायर व्हेरिएंट मध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. यामध्ये ट्यूबलेस टायर लावण्यात आले आहे. या बाईकच्या डिझाईनचा विचार केला तर हे डिझाईन जुन्या मॉडल प्रमाणेच आहे. फक्त कंपनीने इंधन टाकी आणि हेड लॅम्प काऊलवर अपडेटेड ग्राफिक्स दिले आहेत. या बाईक सोबत दहा वर्षाची वॉरंटी पॅकेज देण्यात येते यामध्ये तीन वर्षांची मानक वॉरंटी आणि सात वर्षाची वैकल्पिक विस्तारित वॉरंटी दिली आहे.

Honda Livo च्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये इंटिग्रेटेड इंजन स्टार्ट अँड स्टॉप स्विच, डीसी हेड लॅम्प, कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम, ट्यूबलेस टायर, रियल सस्पेन्शन साठी 5 स्टेप प्रीलोड ऍडजेस्टिबिलिटी देण्यात आली आहे. ही बाईक तुम्ही ॲथलेटिक ब्ल्यू मेटॅलिक मॅड क्रस्ट मेटॅलिक, ब्लॅक या कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकतात.