Honda Monkey लाँच; आकर्षक लूक अन जबरदस्त मायलेज; किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली अनोख्या लूक वाली बाईक Honda Monkey लाँच केली आहे. या बाईकची डिझाईन आकर्षक असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जगभरातील तरुणाईला या गाडीची भूरळ पडणार यात शंकाच नाही. आज आपण Honda Monkey चे फीचर्स, तिचे मायलेज आणि किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

   

फीचर्स –

Honda Monkey 125cc ही बाईक नवीन कलर्स आणि कॉस्मेटिक टचप सह लॉन्च करण्यात आलेली असूनत्याचबरोबर यामध्ये USD फोर्क्स, फ्युअल टॅंक, साईड पॅनल, स्विंगआर्म, ट्वीन रिअर शॉक एब्जोर्ब वर पिवळ्या रंगाचा शेड बघायला मिळतात. त्याचबरोबर फ्रंट आणि रियर फेंडर्स, हेड लॅम्प इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्रेक आणि क्लच लिव्हर्स, टर्न इंडिकेटर्स आणि रियर टेल लॅम्प यांसारखी फीचर्स मिळतात.

इंजिन किती –

Honda Monkey या बाईकच्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर, ही बाईक इतर व्हेरिएंट प्रमाणेच आहे. यामध्ये 125cc इंजिन देण्यात आलेले असून हे इंजिन 9.2 bhp पॉवर आणि 11 nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये 4 स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे. या बाईकचे मायलेज 70.5 किलोमीटर प्रति लिटर आहे. Honda Monkey मध्ये डिस्क ब्रेक देण्यात आलेले असून फ्रंट मध्ये ABS सिस्टीम उपलब्ध आहे. या बाईक मध्ये ऑफ रोडींग ट्रेक पॉवर देखील उपलब्ध आहे.

किंमत किती?

Honda Monkey ही बाईक भारतात नव्हे तर थायलंड मध्ये लाँच करण्यात आली आहे. होंडा मंकी लाईटनिंग एडिशन प्रीमियम ची किंमत थायलंडमध्ये TBH 108900 भाट म्हणजेच 2.59 लाख रुपये एवढी आहे. त्याचप्रकारे स्टॅंडर्ड मंकी व्हेरियंटची किंमत THB 99700 भाट म्हणजेच 2.38 लाख रुपये आहे. एवढेच नाही तर होंडा मंकी इस्टर एग ची एक शोरूम किंमत THB 109,900 भाट म्हणजेच 2.62 लाख एवढी आहे.