Honda ने आणलं Activa चं इलेक्ट्रिक व्हर्जन? Ola, Ather ची झोप उडणार

टाइम्स मराठी । जपान मध्ये सध्या मोबिलिटी शो सुरू आहे. या मोबिलिटी शोमध्ये जगातील दिग्गज ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये Honda कंपनीने देखील सहभाग नोंदवला असून एकापेक्षा एक वरचढ  मॉडेल आणि कन्सेप्ट सादर केले आहेत. या शोमध्ये होंडा कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर SC-e लॉन्च केली. होंडा कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर सर्वत्र एक्टिवाच्या इलेक्ट्रिक व्हर्जनची चर्चा रंगू लागली आहे . होंडा च्या या इलेक्ट्रिक स्कुटर मुळे Ola, Ather या कंपन्यांची झोप उडणार हे मात्र नक्की… आज आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नेमकं काय खास आहे .

   

Honda SC-e Concept

Honda SC-e या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये कंपनीने दोन स्वॅपेबल बॅटरी उपलब्ध केल्या आहेत. या बॅटरीला  Honda Mobile Power Pack e असं म्हटलं जातं. Honda SC-e Concept ही बॅटरी टेक्नॉलॉजी चार्जिंगला लागणारा वेळ कमी करण्यासाठी मदत करते. म्हणजेच यामध्ये स्वॅपेबल बॅटरी असल्यामुळे एका बॅटरीचे चार्जिंग संपल्यानंतर दुसरी बॅटरी टाकता येते. त्यामुळे प्रवास करत असताना तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही.

Honda SC-e बॅटरी आणि मोटर

Honda SC-e या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 2500W क्षमता असलेली इलेक्ट्रिक मोटर उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये इलेक्ट्रिक मोटर सोबतच 3.5 kwh क्षमता असलेले बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर होंडाची ही इलेक्ट्रिक स्कुटर 80 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच अवघ्या 6 सेकंदामध्ये 0 ते 45 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते.

या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये फ्रंट व्हीलमध्ये एकच हायड्रॉलिक ब्रेक आहे. तर मागील चाकावर ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. गाडीच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये LCD स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फ्रंट लाइटिंग पॅनल, हँडलबार, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस एकच शॉक ऍबसॉर्बर मिळतो

Honda SC-e Concept किंमत

Honda SC-e या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर भारतीय चलनानुसार नुसार 2.2 लाख रुपयांच्या किमतीत ही स्कूटर उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतात देखील लॉन्च होऊ शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर चे दोन व्हेरिएंट उपलब्ध केले. यामध्ये स्टॅंडर्ड आणि डीलक्स  व्हेरिएंटचा समावेश होतो.