लवकरच Honda Shine इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येणार!! बाकी कंपन्यांचे टेन्शन वाढणार

टाइम्स मराठी । आज-काल पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींचा कल दिसून येतो.त्यातच भारतीय बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी सर्व कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करण्यामध्ये आपलं लोक आजमावत आहे. यासोबतच आता भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी Honda देखील लवकरच इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे.

   

होंडा कंपनीची शाईन ही बाईक सर्वात जास्त विकली गेलेली आणि प्रसिद्ध अशी बाईक असून १25 सीसी सेगमेंट मधील ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. आता ही शाईन बाईक इलेक्ट्रिक व्हेरियंट (Honda Shine EV) मध्ये कंपनी लॉन्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याबाबत आणखीन कोणतीच माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या बाईकची डिझाईन ही अप्रतिम असणार आहे.

150 किलोमीटर पर्यंत रेंज –

Honda Shine ची लेगसी वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरवण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. जर होंडा कंपनीने शाईन ची इलेक्ट्रिक व्हर्जन बाईक लॉन्च केल्यास यामध्ये वेगवेगळे लेटेस्ट फीचर्स बघायला मिळतील. होंडाच्या आगामी इलेक्ट्रिक शाईन मध्ये 6kwh बॅटरी पॅक देण्यात येऊ शकतो. तसेच ही बॅटरी पाच तासांमध्ये 80% चार्ज होईल. आणि फास्ट चार्जरने तुम्ही ही बाईक चार्ज केल्यास पाच तासांपेक्षाही कमी वेळ लागेल. असं सांगण्यात येत आहे की ही बाईक फुल चार्ज झाल्यावर 140 ते 150 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते.

लवकरच लॉन्च होणाऱ्या Honda Electric Shine मध्ये टीएफटी डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. या डिस्प्ले च्या माध्यमातून बाईक मध्ये असलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. या सोबतच सर्विसिंग डिटेल्स देखील त्यामध्ये दाखवण्यात येतील. बाईकमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स मध्ये ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट, नेविगेशन सुविधा देण्यात येऊ शकते. यामध्ये बरे स्लाइडिंग मोड देखील उपलब्ध असून ही होंडा कंपनीची शानदार इलेक्ट्रिक बाइक असू शकते.