Honda SP160 उद्या होणार लाँच; काय असतील फीचर्स? किंमत किती?

टाइम्स मराठी । भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी असलेली होंडा ३ ऑगस्टला नवीन बाईक लॉन्च करणार आहे. या कंपनीने नवीन मोटरसायकलचा टिझर देखील लाँच केला आहे. होंडा कंपनी बाईक्स आणि स्कूटर च्या सेगमेंट मध्ये नवीन नवीन अपडेट आणत असते. आता लवकरच ही कंपनी बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे या मॉडेलला टक्कर देण्यासाठी नवीन बाईक लॉन्च करणार आहे. Honda SP160 असे या बाईकचं नाव असून या गाडीचा लूक आणि यामध्ये देण्यात आलेले फीचर्स याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत .

   

लुक

Honda SP160 बाईकच्या टिझरनुसार यामध्ये मस्कुलर फ्युल टॅंक आणि फ्युल टॅंक चे एक्सटेंशन देण्यात आलेले असू शकते. यासोबतच एलईडी टेल लाईटसह या बाईकला प्रीमियम आणि खास लुक मिळतो. या बाईक मध्ये शार्प एलईडी हेडलॅम्प आणि स्प्लिट सीट सेटअप देखील असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. Honda SP 160 मध्ये १२ लिटर क्षमता असलेली इंधन टाकी मिळेल.

इंजिन

या बाईकच्या इंजिन बद्दल अशी माहिती समोर आली आहे की, यामध्ये 162 सीसी इंजिन देण्यात येऊ शकते. हे इंजिन ५ गिअरबॉक्सला जोडलं जाईल आणि 12.7 बीएचपी च्या पावरसह 14 nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. Honda SP160 मोटरसायकलला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक-प्रकारचे मोनो सस्पेन्शन मिळू शकते.

किंमत –

होंडा कंपनीची ही नवीन बाईक शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील चालवता येऊ शकते. ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा विचार करूनच ही बाईक तयार करण्यात आली आहे. यासोबतच या बाईकमध्ये ऍडव्हान्स ब्रेकिंग सिस्टीम, डिजिटल स्पीडोमीटर यासारखे फीचर्स देण्यात येऊ शकतात. या बाईकची किंमत 1.10 लाख रुपये एवढी असू शकते.