Honda ने लॉन्च केली प्रीमियम एडवेंचर बाईक; 11 लाख रुपये किंमत

टाइम्स मराठी । भारतातील प्रसिद्ध टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या Honda या कंपनीने XL750 Transalp ही प्रीमियम एडवेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनी ही बाईक कम्प्लीट बिल्ड युनिट CBU रूट ने देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यासाठी होंडाने काही शहरांमध्ये सुरुवातीला 100 ग्राहकांसाठी बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये गुरुग्राम, मुंबई, बेंगलोर, इंदोर, कोची, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकत्ता या शहरांचा समावेश आहे. या बाईकच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 10,99,990 या एक्स शोरूम किमतीमध्ये ही बाईक उपलब्ध आहे.

   

स्पेसिफिकेशन

XL750 Transalp या बाईकमध्ये 755 cc प्यारेलाल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 92 hp पावर आणि 75 nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलेलं आहे. अतिशय दमदार आणि आकर्षक असलेली ही बाईक 180 किलोमीटर प्रतितास इतक्या स्पीड ने धावण्यास सक्षम आहे.

फिचर्स

या बाईकमध्ये होंडा कंपनीने 5.0 इंच TFT डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमध्ये स्पीडोमीटर, टैकोमीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, फ्युल गेज, रायडिंग मोड यासारख्या बऱ्याच  गोष्टींची माहिती दिली जाते. एवढेच नाही तर हा डिस्प्ले रायडरच्या पसंतीनुसार ऍडजस्ट देखील करता येतो. या डिस्प्ले ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सपोर्ट देखील उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकमध्ये अर्बन, रेन, ग्रेवल आणि टूर हे रायडिंग मोड उपलब्ध केले आहे. या सोबतच दोन कष्टमयझेबल रायडींग मोड देखील उपलब्ध आहेत.

सेफ्टी फीचर

XL750 Transalpया बाईकमध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टीम ABS वापरण्यात आली आहे. या सिस्टीमचा वापर सेफ्टीसाठी करण्यात आला आहे. या बाईकच्या दोन्ही टायर मध्ये डिस्क ब्रेक वापरले आहेत. यामध्ये सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल HSTC, व्हीली कंट्रोल यांसारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.