Honda ची SUV कार जपान मध्ये झाली WR-V नावाने लॉन्च; बघा कस केलं आहे डिझाईन

टाइम्स मराठी । भारतात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Honda कंपनीने नवीन एलिवेट SUV सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली होती. आता कंपनीने जपान मध्ये नवीन एलिवेट एसयूव्हीचा री – बेंज वेरियंट लॉन्च केला आहे. हा व्हेरिएंट कंपनीने राजस्थान मधील ऑटोमेकरच्या तापूकारा प्लांटमध्ये डेव्हलप केला होता. जपानमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या व्हेरिएंटचे नाव WR -V आहे. या कारमध्ये एलिवेट प्रमाणेच  सेफ्टी फीचर्स देण्यात आले असून इंटिरियर ब्लॅक टीम मध्ये डेव्हलप करण्यात आले आहे.

   

स्पेसिफिकेशन

WR -V या कार मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.  भारतात लॉन्च करण्यात आलेल्या एलिवेट मध्ये असलेले इंजिन  WR -V या कारमध्ये वापरण्यात आले आहे.  एलिवेट मध्ये देण्यात आलेले इंजिन हे   121  PS पावर आणि 145 NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आले आहे. WR-V या कार मध्ये कंपनीने फक्त सिविटी गिअरबॉक्स वापरले आहे.

डिझाईन

WR -V या कारला  बाहेरून पूर्णपणे एलिवेट एसयूव्ही प्रमाणेच लूक देण्यात आला आहे. परंतु या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या कारच्या इंटिरियर मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहे. त्यानुसार होंडा कंपनीच्या या WR-V या कारच्या केबिनमध्ये ऑल ब्लॅक केबिन थीम आणि वेगळ्या पद्धतीने अपहोस्ट्री देण्यात आली आहे. या कारचे इंटेरियर जापानी वर्जनमध्ये उपलब्ध केले आहे.

फिचर्स

WR -V या कार मध्ये कंपनीने टचस्क्रीन युनिट दिले आहे. याशिवाय लेनवॉच कॅमेरा, रिवर्सिंग कॅमेरा, फॉरवर्ड कॉलिजन वोर्निंग, अडेप्टिव्ह क्रुज कंट्रोल यासारखे ॲडव्हान्स ड्रायविंग असिस्टंट सिस्टीम फीचर्स या कारमध्ये वापरण्यात आले आहे. भारतात लॉन्च करण्यात आलेल्या एलिवेट एसयूव्ही मध्ये  वापरण्यात आलेले 10 इंच टचस्क्रीन सिंगल पेन सनरुफ, वायरलेस फोन चार्जर हे फीचर जपान मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या  WR -V मध्ये देण्यात आलेले नाही. यासोबतच स्ट्रॉंग हायब्रीड सेटअप देखील या कारमध्ये वापरण्यात आला नाही.