Honor 100 आणि Honor 100 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Honor ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीने दोन मोबाईल लॉन्च केले असून  ही सिरीज  Honor 90 लाईनअपचे सक्सेसर आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही मोबाईलचे नाव Honor 100 आणि Honor 100 Pro असं आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहे. सध्या Honor ने हे दोन्ही मोबाईल चीनमध्ये लाँच केले असून लवकरच भारतात सुद्धा हा मोबाईल लाँच होऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Honor 100 या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120  HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. आणि 2600 nits पीक ब्राईटनेस ऑफर करतो. या मोबाईल मध्ये कंपनीने  स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसर दिला आहे. तर Honor 100 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले मिळतो. या मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर मिळतोय.

कॅमेरा

Honor 100 या मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. त्यानुसार ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि LED फ्लॅश सह 50 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 12 MP मायक्रो लेन्स 32 MP टेलीफोटो शूटर सह हायब्रीड झूम मिळते. Honor 100 Pro या मोबाईल मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP डेप्थ सेंसर  देण्यात आले आहे.

बॅटरी

Honor 100 या स्मार्टफोनमध्ये  5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.  ही बॅटरी 100 W फास्ट वायर चार्जिंगला सपोर्ट करते. HONOR 100 PRO या स्मार्टफोन मध्ये कंपनीने  5000 MAH बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 100  W वायर फास्ट चार्जिंगला आणि 66 W वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करते.

स्टोरेज

HONOR 100 या स्मार्टफोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट, 16 GB रॅम, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट, 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट हे तीन व्हेरिएंट उपलब्ध आहे.  HONOR 100 PRO या स्मार्टफोनमध्ये 12 GB रॅम 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट, 16 GB रॅम 256 GB स्टोरेज व्हेरिएंट, 512 GB आणि 1 TB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.

Honor 100 किंमत

Honor 100  या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत CNY 2499  म्हणजेच भारतीय चलनानुसार 29,200 रुपये आहे. तर 16 GB रॅम, 256 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत  CNY 2799  म्हणजेच भारतीय चलनानुसार 32,700 रुपये आहे. आणि 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 2999 म्हणजेच  35000 रुपये एवढी आहे.

HONOR 100 PRO किंमत

HONOR 100 PRO या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 12 GB रॅम 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत, CNY 3399  म्हणजेच 39,700 रुपये आहे. 16 GB रॅम 256 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 3699 म्हणजेच  43,200 रुपये आहे. तर 512 GB  स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CNY 3999 म्हणजे 46,700 रुपये आहे. आणि 1 TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4399 म्हणजेच  51,400 रुपये आहे.