HONOR 90 5G या मोबाईलवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा काय आहे ऑफर?

टाइम्स मराठी । HONOR स्मार्टफोन निर्माता कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. दिवाळीनिमित्त बऱ्याच स्मार्टफोनवर डिस्काउंट ऑफर देण्यात येत होत्या. त्यानुसार तुम्ही देखील कमी किंमतीत मोबाईल खरेदी केलाच असेल. परंतु तुम्ही मोबाईल खरेदी केला नसेल तर तुमच्याकडे आणखीन एक चान्स आहे. त्यानुसार तुम्ही डिस्काउंट ऑफर नुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. कारण HONOR कंपनीने HONOR DAYS SALE सुरू केला आहे. या सेलच्या माध्यमातून स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्ही HONOR 90 हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकतात. जाणून घेऊया काय आहे ऑफर.

   

ऑफर

HONOR DAYS SALE मध्ये HONOR 90 या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि EMI ऑफर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार तुम्ही कमी किमतीमध्ये स्मार्टफोन घरी घेऊन जाऊ शकतात. कंपनीने  HONOR 90 हा स्मार्टफोन याच वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च केला होता. हा 5G स्मार्टफोन आहे. या सेलमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन 31,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय टॉप मॉडेल 12 GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन 33,900 रुपयांमध्ये मिळेल. या सेलमध्ये कंपनीने  HONOR 90 स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. सेल मध्ये HONOR 90 हा स्मार्टफोन तुम्ही ICICI बँकेच्या कार्ड वरून खरेदी केला तर 3000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देण्यात येईल. यासोबतच  12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील यावर उपलब्ध आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अमेझॉनवरून खरेदी करू शकतात.

HONOR 90 या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंच चा क्वाड कर्व्ह AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  1.5 K रिझोल्युशन आणि 120  HZ रिफ्रेश रेट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम  स्नॅपड्रॅगन 7 GEN 1 SOC प्रोसेसर देण्यात आले आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर आधारित OS 7.1 या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 5000 MAH बॅटरी देण्यात करण्यात आली असून ही बॅटरी 66 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

कॅमेरा

HONOR 90 या स्मार्टफोनमध्ये  200 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच अल्ट्रावाईड अँगल 12 MP, 2 MP मायक्रो लेन्स सह LED फ्लॅश युनिट  उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी साठी 50 MP  फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच मोबाईल मध्ये सिक्युरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध करण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

HONOR 90  या स्मार्टफोन मध्ये 8 GB रॅम + 256 GB इंटरनल स्टोरेज आणि  12 GB रॅम + 512 GB इंटरनल स्टोरेज याप्रमाणे स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल ब्रँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS, USB टाईप सी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील उपलब्ध आहे.