Honor ने लाँच केला 200 MP कॅमेरावाला Mobile; बाजारात घालणार धुमाकूळ

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Honor कंपनी अप्रतिम कॉलिटी वाल्या स्मार्टफोन साठी प्रसिद्ध आहे. Honor नुकताच भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच करत पुनरागमन केलं आहे. या मोबाईलची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनीने तब्बल 200 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यासोबतच कंपनीने Honor च्या नवीन स्मार्टफोन मध्ये फोटोज क्लिक करण्यासाठी AI देखील दिले आहे. जाणून घेऊया यामध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स बद्दल

   

कॅमेरा

Honor च्या नवीन स्मार्टफोन मध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे. ज्यामुळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून अप्रतिम फोटोज क्लिक करता येतील. यासोबतच क्लोजअप फोटो घेण्यासाठी देखील मज्जा येईल. त्यानुसार Honor कंपनीने या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरली आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तम फोटोज क्लिक करता येतील. या स्मार्टफोनचा कॅमेरा कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट फोटो कॅपचर करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.

AI चा वापर

Honor कंपनीच्या नवीन स्मार्टफोनच्या कॅमेरा मध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून फोटोस क्लिक करत असताना AI त्यामध्ये सुधारणा करून फोटो क्लिक करण्यास सांगेल. म्हणजेच फोटो कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या अँगलने चांगला येईल हे AI सांगेल. आणि परफेक्ट फोटोग्राफर प्रमाणेच फोटो येतील.

प्रोसेसर

Honor च्या या स्मार्टफोनमध्ये उच्च कार्यक्षमता असलेले प्रोसेसर वापरण्यात आले आहे. हे प्रोसेसर मल्टीटास्किंग आणि एप्लीकेशन वापरत असताना शानदार अनुभव देतात. यासोबतच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मजबूत बॅटरी दिली आहे. ही बॅटरी स्मार्टफोनला पूर्ण दिवसभर चालू ठेवते. म्हणजेच या स्मार्टफोनची चार्जिंग संपण्याची चिंता युजर्सला राहणार नाही. आणि अप्रतिम सुविधांचा लाभ युजर घेऊ शकतील.

सॉफ्टवेअर अपडेट

Honor कंपनीने हा नवीन स्मार्टफोन स्लिम आणि स्टायलिश लुक मध्ये डिझाईन केला आहे. या स्मार्टफोनमध्ये नेव्हिगेशन करणे अत्यंत सोपे आहे. यासोबतच कंपनीने स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर देखील अपडेट करणार असल्याचे देखील सांगितले. या स्मार्टफोनमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. Honor कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे.