Honor Magic 6 Lite 5G मार्केट मध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । Honor कंपनीने युरोपियन मार्केटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नविन मोबाईल कंपनीने मॅजिक 5 लाईट 5G स्मार्टफोनचा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च केला आहे. Honor Magic 6 Lite 5G असे या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या मोबाईलचे नाव आहे. यामध्ये अप्रतिम कॅमेरा क्वालिटी आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फक्त सिंगल व्हेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे. घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

   

स्पेसिफिकेशन

Honor Magic 6 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2562×1200 पिक्सेल रिझोल्यूशन, 99.8% स्क्रीन टू बॉडी रेशो , 1200 nits पीक ब्राईटनेस आणि 120 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा डिस्प्ले सेंटर पंच होल कट आउट मध्ये येतो.

कॅमेरा– Honor Magic 6 Lite 5G

Honor Magic 6 Lite 5G स्मार्टफोन मध्ये 3x लॉसलेस झूम सोबत कॅमेरा सेटअप मिळतो. त्यानुसार प्रायमरी कॅमेरा 108 MP, अल्ट्राव्हाइड लेन्स 5 MP , मायक्रो सेंसर 2 MP आणि 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Honor Magic 6 Lite 5G मध्ये कंपनीने 5300 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 35W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. हे प्रोसेसर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह जोडण्यात आले आहे.

किंमत

Honor Magic 6 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये कंपनीने मिडनाईट ब्लॅक, एम्रराल्ड ग्रीन, सनराइज ऑरेंज कलर ऑप्शन उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतींबद्दल अजून घोषणा करण्यात आली नसून हा मोबाईल 27 डिसेंबरला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.