टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Honor ने नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा हा तिसरा फोल्डेबल Mobile असून कंपनीने मागच्या महिन्यात purse V आउट वर्ड फोल्डिंग फोन लॉन्च केला होता. यासोबतच कंपनीने याच वर्षी मॅजिक V नावाने देखील एक पोर्टेबल मोबाईल लॉन्च केला होता. त्यानंतर आता Honor ने Honor Magic Vs 2 हा तिसरा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा मोबाईल अतिशय स्लिम आणि हलका फुलका आहे. हा एक बुक स्टाईल फोल्डेबल फोन असून याचे वजन 2029 ग्राम एवढे आहे. यामध्ये कंपनीने रेअर अर्थ मॅग्नेशियम अलॉयचा वापर केला आहे.
स्पेसिफिकेशन–
Honor Magic Vs 2 या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 120 hz रिफ्रेश रेटसह 6.43 इंचचा AMOLED प्राइमरी एक्सटर्नल डिस्प्ले उपलब्ध केला आहे. हा डिस्प्ले 2344 × 2156 पिक्सेल रिझोल्युशन आणि 2500 निट्स मॅक्झिमम ब्राईटनेस प्रदान करतो. या मोबाईल मध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या इंटरनल डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 7.9 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2376 × 1060 पिक्सेल रिझोल्युशन आणि 120 hz रिफ्रेश रेट सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 + जेन 1 प्रोसेसर दिले आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर बेस्ड मॅजिक OS 7.2 वर काम करतो.
कॅमेरा– Honor Magic Vs 2
Honor Magic Vs 2 या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्राव्हाइड अँगल आणि 20 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेराचा समावेश आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये 5000 MAH बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 66 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हॉनर कंपनीचा हा होल्डेबल स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे.
किंमत किती?
Honor Magic Vs 2 हा फोल्डेबल स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे. यातील 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट ची किंमत CYN 6999 म्हणजेच भारतीय करन्सीनुसार हा स्मार्टफोन 80 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर 16 GB रॅम आणि 512 GB व्हेरिएंट ची किंमत CNY 7,699 म्हणजेच भारतीय चलनानुसार, 88 हजार रुपये एवढी आहे. हा मोबाईल ग्लेशियर ब्ल्यू, वेलवेट ब्लॅक आणि कोरल पर्पल कलर मध्ये उपलब्ध आहे.