Honor Play 50 Plus : Honor ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; 12GB रॅम अन बरंच काही

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Honor कंपनी अप्रतिम कॉलिटी वाल्या स्मार्टफोन साठी प्रसिद्ध आहे. आता Honor कंपनीने नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच हा मोबाईल भारतीय बाजारपेठेमध्ये देखील लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Honor Play 50 Plus असं या मोबाईलचे नाव असून हा एंट्री लेव्हल 5G स्मार्टफोन ग्राहकांना परवडेल अशा किमतीत बाजारात आणला गेला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.

   

स्पेसिफिकेशन

Honor Play 50 Plus या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच चा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. कंपनीने हा डिस्प्ले पंच होल डिझाईनमध्ये उपलब्ध केला आहे. हा मोबाईल आऊट ऑफ द बॉक्स मॅजिक ओएस 7.2 बेस्ड अँड्रॉइड 13 वर काम करतो. एवढेच नाही तर यामध्ये कंपनीने डायमेनसिटी 6020 प्रोसेसर दिला आहे.

कॅमेरा – Honor Play 50 Plus

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचच झाल्यास, Honor Play 50 Plus मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रॅम आणि बॅटरी

Honor Play 50 Plus या स्मार्टफोनचे दोन स्टोरेज वेरिएंट कंपनीने लॉन्च केले आहे. यातील एक म्हणजे 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज आणि दुसरा म्हणजे 8 GB रॅम + 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंट असलेला मोबाईल. कंपनीने यामध्ये 6000 mAh ची दमदार बॅटरी दिली असून एकदा ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यानंतर पूर्ण दिवसभर काम करते.

किंमत किती?

Honor Play 50 Plus या या मोबाईलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 16,268 रुपये आहे. तर बेस व्हेरिएंटच्या किमतीबद्दल अजून माहिती उघड झालेली नाही