Honor X7b : 108 MP कॅमेरासह Honor ने लाँच आकर्षक मोबाईल; पहा किंमत

टाइम्स मराठी । Honor कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  ऑफिशियली नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Honor X7b आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध केला असून यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने हा मोबाईल फ्लोइंग सिल्वर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. बाजारात या नव्या मोबाईलची किंमत 259 डॉलर म्हणजेच 20,800 रुपये आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

 स्पेसिफिकेशन

Honor X7b या स्मार्टफोन मध्ये LCD पॅनलवर 6.8 इंच  FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  HD रिझोल्युशन आणि 90 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा मोबाईल मॅजिक ओएस 7.2 इंटरफेस  सह आउट ऑफ बॉक्स अँड्रॉइड 13 वर चालतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 Soc प्रोसेसर दिला आहे. महत्वाचे म्हणजे या मोबाईल मध्ये 6000 MAH बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18 तास व्हिडिओ प्लेबॅक, 24 तास सोशल मीडिया ब्राउझिंग आणि 69 तास म्युझिक स्ट्रीमिंग सुविधा देते. 

कॅमेरा– Honor X7b

Honor X7b हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार यामध्ये 108 MP प्रायमरी कॅमेरा मिळतो. हा प्रायमरी कॅमेरा F/1.8 अपर्चरसह येतो. त्याचबरोबर 5 MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2 MP मायक्रो सेंसर यामध्ये देण्यात आला आहे. सेल्फी साठी मोबाईल मध्ये 8 MP कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोन मध्ये 6/8 GB रॅम आणि 128GB/256 GB इंटरनल स्टोरेज मिळते.