Honor X9b 5G : Honor ने लाँच केला नवा मोबाईल; 108 MP कॅमेरा,12 GB रॅम अन बरंच काही …

HONOR कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor X9b 5G असे या नव्या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल सनराइज् ऑरेंज, मिड नाईट ब्लॅक आणि एमेरल्ड ग्रीन कलर या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत नेमकी किती असेल याचा खुलासा अजून तरी कंपनीने केला नाही. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

   

स्पेसिफिकेशन

Honor X9b 5G या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 1200× 2652 पिक्सल म्हणजेच 1.5 k रिझर्वेशन प्रदान करतो. यासोबतच हा डिस्प्ले 120  HZ रिफ्रेश रेट सह येतो. या डिस्प्ले चा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. या डिस्प्ले ची पिक्सेल डेन्सिटी 429 PPI आणि स्क्रीन टू बॉडी रेशो 92.8 % एवढा आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor X9b 5G या स्मार्टफोन मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध केला आहे. त्यानुसार स्मार्टफोनमध्ये 108 MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध केला आहे. तसेच तुम्हाला यामध्ये 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मायक्रो सेंसर देखील उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्टोरेज व्हेरिएंट

HONOR च्या या स्मार्टफोन मध्ये कंपनीने क्वालकॉम ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर दिला आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड magicOS 7.2 वर चालतो. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च केला आहे.  यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज आणि 12 GB रॅम, 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर्स

Honor X9b 5G मध्ये 5G सपोर्ट, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, वाय-फाय 802.11, USB Type C पोर्ट यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 5800 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 35 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.