108 MP कॅमेरासह लाँच झाला Honor X9b; 12 GB रॅम, किंमत किती?

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ,मोबाईल निर्माता कंपनी Honor ने जागतिक बाजारात Honor X9b हा मोबाईल लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये खास गोष्ट म्हणजे 12 GB रॅम आणि तब्बल 108 MP कॅमेरा तुम्हाला मिळत आहे. सध्या हा मोबाईल युनायटेड अरब अमिरात मध्ये लाँच झाला असून काही दिवसांनी भारतात सुद्धा लाँच होणार आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल ..

   

स्पेसिफिकेशन

Honor X9b या स्मार्टफोन मध्ये 6.78 इंच पंच होल डिस्प्ले देण्यात आला असून या डिस्प्ले मध्ये 1200 ×2652 पिक्सल रिझोल्युशन मिळते. हा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट सह 1200 निट्स ब्राईटनेस देतो. त्याचबरोबर हा डिस्प्ले 429 PPI ला सपोर्ट करतो. Honor चा हा मोबाईल अँड्रॉइड 13 वर बेस्ड MagicOS 7.2 वर काम करतो. यामध्ये प्रोसेसिंग साठी 2.2 गीगाहर्ट्स क्लॉक स्पीड क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor X9b मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप  देण्यात आला आहे. यामध्ये 108 MP चा प्रायमरी कॅमेरा, 2 MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि MP मायक्रो सेंसर उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Honor X9b मध्ये पावर बॅकअप साठी 5800 mAh ची दमदार बॅटरी मिळतेय. तसेच हि बॅटरी  35W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. महत्वाची गोष्ट म्हणजे Honor कंपनीने 12 GB रॅम या स्मार्टफोन मध्ये दिली आहे. तसेच 8 GB वर्चुअल रॅम सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजेच एकूण 20 GB रॅम या मोबाईलला मिळत आहे.

किंमत किती?

HONOR X9b या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत भारतीय चालनानुसार 31,000 रुपये एवढी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा मोबाईल काळ्या, हिरव्या आणि केसरी रंगात उपलब्ध आहे.