Horoscope : ‘या’ राशींवर होणार शनी देवाची कृपा; बक्कळ पैसे अन मानसन्मान मिळणार

टाइम्स मराठी । बराच वेळ शनी हे नाव ऐकताच काही जणांच्या तोंडावर बारा वाजता. कारण शनी मागे लागणं हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये (Horoscope) शनी ग्रहाला पापी ग्रह देखील म्हंटल जातं. कारण वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण बारा प्रकार असतात. या बारा प्रकारांपैकी ज्या राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती असते त्या लोकांचे चांगले दिवस संपून वाईट दिवस सुरू होतात. शनि देव कर्माचा दाता आणि न्याय करता म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तरीही शनि देवाला बरेच लोक घाबरतात. कारण मानवाला त्याच्या कर्माचे फळ आणि शिक्षा देखील शनिदेव देतात.

   

आता शनी ग्रह कुंभ राशीमध्ये असून सध्या प्रतिगामी गतीमध्ये जात आहे. हे काही दिवस असच सुरू राहणार असून या राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा अशुभ प्रभाव सुरू झाला आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी काही दिवस जास्त सावध राहण्याची गरज आहे. शनी या राशीमधून नोव्हेंबर 2023 ला वळण घेईल आणि बऱ्याच राशींवर त्यांची कृपा आशीर्वाद दाखवेल. जेव्हा शनी कुंभ राशी मधून वळण घेईल त्यावेळी बऱ्याच राशींवर (Horoscope) त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. नेमकं या राशी कोणत्या ज्यावर त्यांचा शुभ प्रभाव असेल ते आपण आज जाणून घेणार आहोत.

१) मकर रास

4 नोव्हेंबरला शनि मकर राशीतुन धनाच्या घराकडे जाईल. यामुळे या राशींच्या लोकांना शुभ लाभ होणार असून पैसे कमवण्यासाठी बऱ्याच संधी उपलब्ध होतील. एवढेच नाही तर व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल. त्यामुळे पैशाची कोणतीही कमी तुम्हाला भासणार नाही. असे समजा कि आत्ता जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी शनी देवाच्या कृपेने लवकरच तुम्हाला धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते.

२) वृषभ- (Horoscope)

या राशींच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात शनिदेव कृपादृष्टी लाभेल. त्यानंतर या राशीतून शनीचे दशम भाव भ्रमण होईल. आणि वृषभ राशींतील लोकांना संपत्ती कमावण्याची, जमवण्याची सुवर्णसंधी मिळेल. या काळात तुम्ही करिअर पासून ते व्यवसायापर्यंत प्रगती करू शकाल. एवढेच नाही तर नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि समाजात सन्मान देखील वाढेल.

३) धनु-

धनु राशींच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात शनीचा प्रभाव होणार असून ऑफिसच्या कामामध्ये प्रगती होईल. वरिष्ठ मंडळींकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सहकारी देखील या काळात तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. शनी देवाच्या कृपेने येत्या काही दिवसात तुमची रखडलेली अनेक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.