Horoscope : ‘या’ 3 राशींच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची गरज! बायकोचं लफडं, बँकेचं कर्ज अन नोकरीवर संकट येणार?

टाइम्स मराठी टीम (Horoscope) | आज गुरुवारचा दिवस अनेक कारणांनी पंचमहाभुतांसाठी महत्वाचा मानला जातो. उद्या ९ जून पासून वातावरणात मोठा बदलालाल सुरवात होत असून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होणार आहे. यामुळे वातावरणासोबतच तुमच्या इतर अनेक गोष्टीवर पंचांगानुसार बदल होणार आहे. मेष, वृषभ, कन्या, धनु आणि कुंभ या राशींसाठी पुढील काही दिवस लक्ष्मी प्रसन्न होणार असून घरात अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे. मात्र याकरता कष्ट, चिकाटीसोबतच तुमच्याबद्दल तेढ असणार्यांपासून चार हात लांब राहणे गरजेचे आहे. यासोबतच मिन, तूळ आणि सिंह या तीन राशींच्या व्यक्तींना सतर्क राहणे गरजचे आहे. या राशीतील लोकांना बायकोच लफडं, बँकेचं कर्ज आणि नोकरीवर गदा अशा संकटांचा सामना करावा लागू शकतो असे सांगितले आहे.

   

मीन –

मीन राशीतील व्यक्तींसाठी जून चा महिना भरभराट घेऊन आला आहे. या राशीतील व्यक्तींचा समाजात गौरव होऊन त्यांना प्रतिष्ठा मिळणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला समाजातील सामान्य जनतेच्या समस्या धाडसाने सोडवणे गरजचे आहे. नवीन व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. नोकरीमध्ये स्थिरता असून नातेसंहधत काहीशी ओढाताण होऊ शकते. यामध्ये पत्नीचे बाहेर लफडे असेल तर याबाबत तुम्हला माहिती होणार आहे. शांत राहून या सर्वांना धीराने सामोरे गेलात तर सर्व समस्यांवर तुम्ही अगदी सहजपणे उत्तर काढाल.

तूळ –

तुला राशीतील व्यक्ती रंगीत अन तापट वागू शकतात. तुमच्या अगदी हृदयाच्या जवळची लोकं तुम्हाला लहान सहन कारणांवरून दुखवू शकतात. काही जुने मित्र तुमची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासाठी तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. संसारात या राशीतील व्यक्तींना बऱ्यापैकी स्थिरता दिसत आहे परंतु तुम्ही परस्त्रीसोबत कोणताही व्यवहार ठेवलात तर पत्नी यावरून तुमच्याशी वाद घालू शकते. नवीन व्यवसायात तुरळक अडचणींचा सामना करावा लागेल परंतु तुम्ही धाडसाने त्यांना सामोरे गेलात तर विजयी व्हाल.

सिंह –

सिंह राशीतील व्यक्तींना नातेसंबंध हाताळताना सतर्क राहणे गरजेचे आहे. पती – पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जर कोणी एकाने समजूतदारपणा दाखवला नाही तर हि किरकोळ वादावादी अतिशय टोकाला जाऊन काही मोठी घटना घडू शकते. व्यवसायात तुम्हाला भरभराट आहे परंतु हातात आलेले पैसे वेळीच गुंतवले नाहीत तर लगेचच खर्च होऊन तुमची तिजोरी रिकामी होऊ शकते. तुम्ही नोकरदार असाल तर कामावर लक्ष द्या. कामातील नेहमीच चुकारपणा तुमची नोकरी घालवू शकतो.