Ethanol कसे बनते? गाडीला इंधन म्हणून इथेनॉल कसं उपयुक्त ठरेल?

टाइम्स मराठी । या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च देखील पुरत नसताना पेट्रोलचे दिवसेंदिवस भाव वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आग लागल्याचे दिसून येतं. अशातच या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा मिळवण्यासाठी इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २९ ऑगस्टला इथेनॉल वर चालणारी गाडी सादर करणार आहेत. परंतु हे इथेनॉल म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊया इथेनॉल बद्दलची माहिती.

   

बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशामध्ये पूर्णपणे इथेनॉल फ्युल असलेल्या कार्स 29 ऑगस्टला लॉन्च करणार असल्याचं सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, इथेनॉलची किंमत ही फक्त 60 रुपये प्रति लिटर एवढी आहे. इथेनॉल कार मध्ये वापरल्यास कार पंधरा ते वीस किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देऊ शकते. पेट्रोलच्या तुलनेमध्ये हे इथेनॉल प्रचंड स्वस्त असून इथेनॉलमुळे बरेच फायदे देखील होतात.

काय आहे इथेनॉल?

इथेनॉल हे एक अल्कोहोल आहे. हे पेट्रोल सोबत मिक्स करून वापरले जाते. हे इथेनॉल खास करून उसाच्या पिकापासून तयार केले जाते. प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर केला जातो. वाढते प्रदूषण पाहता सरकारने हे पाऊल उचलले असून या इथेनॉलला इथाईल, अल्कोहोल किंवा ग्रेन अल्कोहोल असं देखील म्हटले जाते. इंधन म्हणून वापरण्यात येणारे जैवइंधन तयार करण्यासाठी इथेनॉल बऱ्याचदा मध्ये मिक्स केले जाते. परंतु त्याच्यासाठी एक प्रमाण महत्त्वाचे आहे. त्या प्रपोर्शनानुसार आपण मिक्स करून योग्य प्रमाणात वापरू शकतो. फ्लेक्स फ्युल तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या काही वाहनांमध्ये इथेनॉल वापरले जाते.

काय आहे इथेनॉल वापरण्याचे प्रमाण

इथेनॉल वापरण्यासाठी गॅसोलीन किंवा पेट्रोलमध्ये काही टक्के मिक्स करावे लागते. E10 म्हणजेच 10 टक्के इथेनॉल आणि 90% गॅसोलीन, किंवा E85 म्हणजे 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के गॅसोलीन अशाप्रकारे प्रमाण वापरले जाते. याचा अर्थ असा होतो की, पेट्रोल किंवा गॅसोलिन मध्ये वापरले जाणारे इथेनॉल हे पेट्रोल आणि गॅसोलीनच्या टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच E10 मध्ये इथेनॉल हे दहा टक्के वापरले असून E85 म्हणजे इथेनॉल हे 85% वापरण्यात आले आहे.

अशाप्रकारे बनते इथेनॉल

इथेनॉल हे खास करून ऊस पिकांपासून तयार केले जात असून या सोबतच साखर पिकांपासून देखील तयार करता येते. इथेनॉलमुळे शेती आणि पर्यावरणाला प्रचंड फायदा होतो. आणि सर्वसामान्यांना परवडणारे हे अल्कोहोल असून खर्च देखील यासाठी कमी येतो. यासोबतच शेतकऱ्यांना देखील याचा प्रचंड फायदा होतो.

इथेनॉल वापराचा फायदा

इथेनॉल वापरल्यामुळे शेतकऱ्यांना देखील लाभ होऊ शकतो. कारण इथेनॉल हे पूर्णपणे शेतीच्या काही पिकांपासून बनवलेले गेलेले असते. आणि हे इथेनॉल पूर्णपणे शेतकरीच बनवतात. इथेनॉलमध्ये 35% ऑक्सिजन असते. त्याचबरोबर इथेनॉल च्या वापरामुळे गाड्यांमधून पस्तीस टक्के पेक्षा कमी कार्बन म्हणून ऑक्साईड उत्सर्जित होईल. त्याचबरोबर सल्फर डाय ऑक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन ऑक्साईड या सर्वांचे उत्सर्जन देखील कमी होऊ शकते. देशामध्ये ऑइल इम्पोर् मध्ये 16 लाख करोड रुपये खर्च होतात. इथेनॉलमुळे हा खर्च वाचू शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेला देखील प्रचंड फायदा होईल.

इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स केल्यास फायदा

इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्यानंतर गाडी चालवल्यास गाडी जास्त गरम होत नाही. इथेनॉल मध्ये असलेले अल्कोहोल लवकर उडते आणि इंजन गरम होत नाही. त्याचबरोबर कच्च्या तेलापेक्षा इथेनॉल इंधन हे अत्यंत स्वस्त असून यामुळे महागाई पासून आपण बचाव करू शकतो. त्याचबरोबर इथेनॉलचा वापर वाढल्यास मका ऊस आणि बाकीच्या पिकांची मागणीही देखील वाढेल. आणि शेतकऱ्यांना देखील पैसे मिळतील. आतापर्यंत शेतकऱ्यांना इथेनॉलमुळे 21000 करोड रुपयांचा फायदा झाला आहे.