टाइम्स मराठी | सध्याच्या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. आता मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. स्मार्टफोन मध्ये आपल्याला सिम कार्डची (Sim Card) गरज असते. या सिम कार्डच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार करून कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. या सरकारच्या नियमानुसार आता ग्राहकांना चार पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी करता येणार नाही.
बऱ्याचदा आपल्याला एखादा फ्रॉड कॉल च्या माध्यमातून आपल्या अकाउंट मधून पैसे गेल्यानंतर आपण जेव्हा फ्रॉड कॉल आलेल्या नंबर वर कॉल करतो, तेव्हा तो नंबर स्विच ऑफ करण्यात आलेला असतो. अशा प्रकारच्या फ्रॉडींगच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. एवढेच नाही तर सरकार यासाठी नियम देखील लावत आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून सिम कार्ड चा अवैध्य वापर करणाऱ्या आरोपींना शोधून काढले होते. त्यानुसार तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने सिम घेतलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खरं तर देशात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून आधार कार्ड (Aadhar Card) मिळवून किंवा आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून सिम कार्ड खरेदी करणे सायबर गुन्हेगारांना हे अत्यंत सोपे आहे. त्यामुळे आधार कार्ड बद्दलची माहिती शेअर करू नका. जेणेकरून तुमच्या आधार कार्डचा वाईट वापर करण्यात येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत किंवा वापरात आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
1) टेलिकॉम डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट tafcop. dgtelecom. gov.in वर जा.
2) या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.
3) यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP हे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
4) यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर OTP येईल. हा ओटीपी त्या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
5) यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर उपलब्ध असलेल्या सिम कार्ड ची माहिती मिळेल.
त्याचबरोबर कोणता नंबर तुम्ही स्वतः रजिस्टर केला आहे हे देखील या वेबसाईटच्या माध्यमातून समजेल. आणि तुमच्या आधार कार्ड वर बरेच अनोळखी सिम सुरू असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याच वेबसाईटवर माहिती देऊ शकता.