फ्रिज आणि भिंतीमध्ये किती अंतर असावं? वीजबिल कमी येण्यासाठी काय करावं?

टाइम्स मराठी | आजकाल प्रत्येकजण गरजेच्या वस्तूंमध्ये फ्रिज चा वापर करत असतात. यामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात विज बिल येत असल्याचे देखील प्रत्येक जणांचं मत असतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का? हे वीज बिल चुकीच्या पद्धतीने फ्रिज सेटअप केल्यामुळे येत असतं. त्यामुळे विजेचे बिल आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यावा लागतील. घरामध्ये फ्रिज सेटअप करत असताना फ्रिज आणि भिंत या दोघांमध्ये किती अंतर हवे याचा विचार कोणीही करत नाही. परंतु या चुकीमुळे विज बिल वाढते. बरेच जण हॉल किंवा किचन मध्ये फ्रीज ठेवत असतात. फ्रिज ठेवण्यासाठी एक निश्चित जागा नसते ज्या ठिकाणी फ्रिज मावेल त्या ठिकाणी ठेवला जातो. पण फ्रिज आणि भिंत यामधील अंतर खूप महत्त्वाचे आहे.

   

किती असावं फ्रिज आणि भिंती मधील अंतर?

फ्रिज आणि भिंतीमध्ये 6 ते 10 इंच एवढे अंतर असणे गरजेचे आहे. कारण फ्रिजच्या शेजारी खेळती हवा असणे गरजेचे असते. फ्रिज आतून थंड राहण्यासाठी फ्रिजच्या चारही साईडने मोकळा स्पेस गरजेचा असतो. जेणेकरून खेळती हवा राहील. त्यानुसार फ्रीज भिंतीला चिटकवून लावणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचबरोबर काही गोष्टी फ्रीज संदर्भात लक्षात घेणे गरजेचे आहे.

1) जर तुम्ही फ्रीज मध्ये जास्त गोष्टी भरून ठेवत असाल तर फ्रिजच्या कुलिंगसाठी जास्त वीज चा वापर होतो. आणि वीज जळते.
2) फ्रिज आणि भिंतीमध्ये सहा ते दहा इंच अंतर ठेवल्यामुळे विज बिल आटोक्यात येऊ शकते.
3) फ्रिज मध्ये जास्त अन्न साठवून ठेवल्यामुळे फ्रिजवर जास्त लोड येतो. यामुळे जास्त अन्न आणि सामान यामध्ये ठेवू नये.
4) फ्रिजला घट्ट प्लास्टिक कव्हर घालू नका. यामुळे फ्रीजमध्ये गर्मी निर्माण होऊ शकते.
5) प्लीज जास्त वेळ उघडझाप करू नका. यामुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येते.