आधारकार्ड वरील जन्मतारीख चूकलीय? अशा प्रकारे करा दुरुस्त

टाइम्स मराठी । आज काल ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. आधार कार्ड शिवाय कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही. या आधार कार्डच्या माध्यमातूनच आपण सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी देखील आधार कार्डची गरज पडते. या आधार कार्डच्या माध्यमातून कार्डधारकांची बायोमेट्रिक आणि जनसांख्यिकीय माहिती मिळते. बऱ्याच व्यक्तींच्या आधार कार्ड मध्ये काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात परंतु या चुका दुरुस्त करणे अतिमहत्त्वाचे असत .आधार कार्ड बनवण्यासाठी जेव्हा आपण माहिती देतो ती माहिती आधार कार्ड वर प्रिंट केली जाते. परंतु बऱ्याचदा चुकीची माहिती दिल्यामुळे पत्ता, जन्म दिनांक किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव देखील चुकू शकते. तुमच्या देखील आधार कार्ड वर जन्मदिनांक किंवा पत्ता चुकलेला असेल तर घाबरून जाऊ  नका. सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड दुरुस्त करू शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड वरील चूक सुधारता येऊ शकते.

   

हे कागदपत्र गरजेचे

तुमच्या आधार कार्डवर जन्म दिनांक चुकीची टाकली गेली असेल तर आधार सेवा केंद्रावर जाण्यापूर्वी जन्म प्रमाणपत्र किंवा जन्म दिनांकचा प्रूफ मिळेल असे कागदपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक, पॅन कार्ड हे कागदपत्र तुम्हाला घेऊन जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल. आधार कार्ड वरील  चुकीची जन्मतारीख सुधारण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला केंद्राने सांगितलेल्या तारखेला आणि वेळेमध्ये आधार केंद्रावर जावे लागेल. तिथे गेल्यावर खालील प्रोसेस पूर्ण करा.

1) आधार कार्ड केंद्रावर गेल्यावर करेक्शन फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव आधार नंबर, जन्म दिनांक याप्रमाणे विचारलेली माहिती टाकावी लागेल. आणि या फॉर्मसोबत आवश्यक असलेले कागदपत्र जोडावे लागेल.

2) हा फॉर्म भरल्यानंतर ऑथॉरिटीच्या माध्यमातून बायोमेट्रिक्स करण्यात येईल.

3) त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल. तुम्ही फॉर्म सोबत जोडलेले डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुमची जन्म दिनांक अपडेट करण्यात येईल.