Cylinder मध्ये गॅस किती शिल्लक आहे ते कस चेक करायचं? ही घरगुती Trick वापरा

टाइम्स मराठी । गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) हे प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी लागणारे साधन आहे. घर , कपडे याप्रमाणेच गॅस ही जीवनावश्यक वस्तू बनली आहे. बऱ्याचदा स्वयंपाकाच्या नादात सिलेंडर मधील गॅस संपून जातो. परंतु आपल्याला याची भनक देखील लागत नाही. अशावेळी आपल्याकडे दुसरा भरलेला गॅस सिलेंडर नसेल तर प्रचंड तारांबळ उडते. पण तुम्ही काही गोष्टींचा वापर करून आपल्या सिलिंडर मध्ये गॅस किती शिल्लक आहे. हे जाणून घेऊ शकतात. तुमच्या सिलेंडर मध्ये गॅस किती उपलब्ध आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक ओला टॉवेल लागेल. या टॉवेलच्या माध्यमातून तुम्हाला गॅस किती शिल्लक आहे हे कळू शकेल.

   

कसे चेक करावं ?

ओल्या टॉवेलच्या माध्यमातून गॅस किती शिल्लक आहे हे कळण्यासाठी सर्वात पहिले ओला टॉवेल सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. यामुळे सिलेंडरची टाकी ओली होईल. त्यानंतर हा टॉवेल काढून घ्या. त्यानंतर टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे याकडे लक्ष द्या. यावरून तुम्ही गॅसची लेव्हल तपासू शकतात. म्हणजेच जो भाग लवकर वाळेल त्या भागात गॅस नसून जो भाग ओला आहे त्या लेवल पर्यंत गॅस शिल्लक आहे. गॅस सिलेंडर मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लिक्विड उपलब्ध असते. त्यामुळे सिलेंडरच्या जितक्या भागांमध्ये गॅस असेल तेवढा भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला राहतो. हा भाग लवकर वाळत नाही. पण ज्या भागांमध्ये गॅस नाही तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.

दरम्यान, जीवनावश्यक गोष्ट बनलेल्या गॅस सिलिंडरच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. सध्या घरगुती गॅसची किंमत ११०२ रुपये झाली असून या महिन्यात गॅसच्या किमती कमी होतात कि वाढतात याकडे पुन्हा एकदा जनतेचे लक्ष्य लागलं आहे.