आधार कार्ड खरं आहे की खोटं? ओळखायचं तरी कसं? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा

टाइम्स मराठी । महत्त्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक असलेले आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येकाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, स्कूल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, एवढेच नाही तर बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी देखील आधार कार्डची गरज लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशातच तुम्हाला माहित आहे का आधार कार्ड व्हेरिफाय कशा पद्धतीने केले जाते? आणि तुम्हाला माहित आहे का तुमचे आधारकार्ड ओरिजनल आहे की नाही? हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

   

आजकाल फेक डॉक्युमेंट्स मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले आधार कार्ड हे फेक असेल तर तुम्हाला बऱ्याच परेशानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आधार कार्ड व्हेरिफाय करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी चिंता करण्याची गरज नसून आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने आधारकार्ड व्हेरिफाय करण्याची पद्धत सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे आधारकार्ड असली आहे की नकली हे समजेल.

आज-काल आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र बनले आहे. त्यामुळे कोणत्याही कामासाठी किंवा खरेदी विक्री करताना आधार कार्डचा वापर केला जातो. त्याचप्रकारे तुमच्यासोबत एखादा व्यक्तीने फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत तुम्हाला नकली आधार कार्ड दाखवले तर तुम्हाला हे आधार कार्ड खरे आहे की खोटे हे तपासणे गरजेचे ठरेल. यासाठी तुम्ही दोन पद्धतीने आधार कार्ड चेक करू शकतात. त्यानुसार पहिली पद्धत म्हणजे QR कोड स्कॅनर. आणि दुसरी पद्धत म्हणजे UIDAI साईट. या दोन्ही पद्धतींच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू शकतात.

१) QR कोड

आधार कार्ड वर राईट साईडला QR कोड दिलेला असतो. या QR कोड च्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड असली आहे की नकली हे तपासू शकतात. त्यासाठी सर्वात पहिले गुगल लेन्स ॲपच्या माध्यमातून किंवा QR कोड स्कॅनरच्या माध्यमातून आधार कार्ड स्कॅन करा. आधार कार्ड स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर दिसणारी माहिती आणि आधार कार्ड वर दिसणारी माहिती या दोघांमध्ये ताळमेळ नसेल तर काहीतरी गडबड असल्याचं समजून जा.

२) UIDAI साईट

UIDAI च्या अधिकारीच वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू शकतात. त्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in/en/ या वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय आधार हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर आधार कार्ड नंबर कॅपचा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड धारकांचे लिंग , नाव, मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक दिसतील. यानुसार तुम्ही आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता.