आधार कार्डवरील मोबाईल नंबर विसरलाय? चिंता न करता अशाप्रकारे जाणून घ्या

टाइम्स मराठी । आज-काल आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपले ओळखपत्र म्हणून आपण सोबत ठेवत असतो. यासोबतच आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. प्रवास करत असताना, गार्डनमध्ये किंवा  देवदर्शनाला जाताना ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड देतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी, बँकेत खाते सुरु करण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्वपूर्ण आणि गरजेचं बनलं आहे. यासोबतच आता आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे हे अत्यंत गरजेचे आहे. परंतु तुम्हाला आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर (Mobile Number) लिंक आहे हे माहीत नसेल तर बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. आता घाबरून जाण्याचे काम नाही. सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर शोधू शकता.

   

तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर माहित नसेल तर बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्याकडे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असल्यामुळे आपला कोणता मोबाईल नंबर आधार सोबत लिंक आहे हे समजणे कठीण जाते. कारण आधार कार्ड ला  लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP जात असतो. आणि हा OTP मिळणे अत्यंत गरजेचे असते. कारण हा OTP टाकल्याशिवाय आपले काम पूर्ण होऊ शकत नाही. अशावेळी घाबरून जाऊ नका. हा नंबर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने शोधू शकतात. फक्त तुम्हाला खालील प्रोसेस करावी लागेल.

अशा पद्धतीने चेक करा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर

1)  सर्वात आधी UIDAI च्या  https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा.
2) या ठिकाणी तुम्हाला My Aadhar हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर आधार सर्विस ऑप्शन वर क्लिक करा.
4) आधार सर्विस मध्ये व्हेरिफाय एन आधार नंबर या ऑप्शन वर क्लिक करा.
5) त्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका.
6) स्क्रीनवर आलेला Captcha कोड व्यवस्थित भरा.
7) त्यानंतर Proceed To Verify वर क्लिक करा.
8) त्यानंतर आधार कार्ड वर लिंक असलेल्या मोबाईल नंबर चे शेवटचे ३ अंक दिसतील. या अंकावरून तुम्ही मोबाईल नंबर मिळवू शकता.

UIDAI देते आधार हिस्ट्री चेक करण्याची सुविधा

आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI च्या माध्यमातून आधार कार्डची हिस्ट्री देखील समजते. एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे?  त्याचबरोबर पहिल्यांदा कुठे वापरले गेले होते ? यासोबतच आधार कार्ड कोणकोणत्या कागदपत्रांसोबत लिंक आहे हे देखील UIDAI या संस्थेच्या माध्यमातून समजू शकते. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी UIDAI ने ही सुविधा उपलब्ध केली आहे.