आर्थिक संकट येणार हे कसे समजावे? आचार्य चाणक्य सांगतात ‘हे’ 5 संकेत

TIMES MARATHI | आचार्य चाणक्य यांचं लिखाण आणि संग्रह मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या संग्रहापैकी एक म्हणजे चाणक्य नीती. चाणक्य नीती आपल्या जीवनामध्ये प्रचंड उपयोगी पडते. आचार्य चाणक्य यांनी लिखाण केलेल्या चाणक्य नीतीचा फायदा प्रत्येक वयोगटातील मुलांना, व्यक्तींना, वृद्धांना होत असतो. नितीनियमांचे पालन करून कोणतीही व्यक्ती गरिबीतून श्रीमंतीत येऊ शकतो. आचार्य चाणक्यांच्या विचारांपैकी एक विचार त्यांनी सांगितला आहे की, वाईट वेळ येण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचे संकेत मिळत असतात हे ते स्पष्ट करतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याबाबत आधीच संकेत आपल्याला दिले जात असतात. समजा तुमची आर्थिक स्थिती बिकट असेल तर घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपण आर्थिक संकट येणार असल्याचा समजू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरात किंवा आजूबाजूला घडत असलेल्या घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून काय अडचणी येऊ शकतात हे समजेल.

   

तुळशीचे रोप सुकणे

तुळशीचे रोप हे पूजनीय मानले जाते. तुळशीचे रोप घराच्या अंगणात लावल्यास सुख-समृद्धी लाभते. त्याचबरोबर तुळशीचे रोप हे अत्यंत लाभदायी आणि औषधी वनस्पती आहे. ज्याच्या पत्त्यांचा उपयोग आपल्याला सर्दी खोकल्यापासून वाचवत असतो. परंतु तुळशीच्या रोपाची काळजी घेऊनही जर तुळशीचे रोप सुकत असेल तर भविष्यात आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.

सतत भांडण होणे

घरोघरी मातीच्या चुली असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये भांडण हे होतच असतात. परंतु जर तुमच्या घरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात भांडण होत असेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठ्या प्रमाणात भांडण होत असेल तर तुमची आर्थिक स्थिती हालाकीची होणार आहे. असं आचार्य चाणक्य सांगतात.

काच तुटणे

आपण लहानपणापासून वृद्ध आजी आजोबांकडून ऐकलं असेल की काच तुटल्यामुळे अपशकुन होतो. परंतु आपण या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही. घरामध्ये काच सतत तुटत असेल तर दारिद्रता आणि धन या गोष्टींची हानी होऊ शकते. त्यामुळे कधीही काचेच्या गोष्टी सांभाळणे गरजेचे आहे.

देवपूजा न करणे

जर तुम्ही घरामध्ये पूजा पाठ करत नसाल तर तुमच्या जीवनात आणि आयुष्यात सुख समृद्धी येत नाही. आणि भविष्यामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. कारण ज्या ठिकाणी पूजा पाठ होत नाही त्या ठिकाणी देव देवता येत नाही आणि सुख समृद्धी देखील लाभत नाही.

ज्येष्ठांची अवहेलना करणे

घरामध्ये वृद्ध व्यक्ती असल्यास घराला शोभा येते. परंतु ज्या घरामध्ये वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींची सेवा केली जात नाही त्या घरातील व्यक्तींना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. कारण ज्येष्ठ व्यक्तींकडून मिळणारा आशीर्वाद हा उपयोगी मानला जातो. जर तुम्ही त्यांचा मान सन्मान करत नसाल त्यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करत असाल तर आयुष्यात तुम्ही कधीच खुश राहू शकत नाही.