HP Pavilion Plus : HP ने लाँच केला नवा लॅपटॉप; लाखोंत आहे किंमत

टाइम्स मराठी । PC आणि प्रिंटर मेकर HP कंपनीने भारतामध्ये नवीन पवेलियन प्लस नोटबुक (HP Pavilion Plus) लॉन्च केला आहे. कंपनीने कॉमेडियनच्या नवीन सिरीज मध्ये अप्रतिम अनुभवासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला असून न्यू जनरेशन चिपसेट यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. HP ने हा लॅपटॉप वार्म गोल्ड आणि नॅचरल सिल्वर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध केला आहे. HP कंपनीच्या या लॅपटॉपची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये आहे. जाणून घेऊया या लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन– HP Pavilion Plus

HP Pavilion Plus या लॅपटॉप मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह IMAX डिस्प्ले दिला आहे. या लॅपटॉप मध्ये 13 जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच AMD Ryzen 7 सिरीज प्रोसेसर , NVIDIA RTX 3050 ग्राफिक्स देखील यामध्ये तुम्हाला मिळेल. याशिवाय लॅपटॉपमध्ये HP PRESENCE 2.0 देखील उपलब्ध आहे. यामुळे प्रोडक्ट आणि टीम वर्क अप्रतिम बनवण्यासाठी AI फीचर्स चा वापर करण्यात आला आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

HP Pavilion Plus मध्ये पाच मेगापिक्सेल इन्फ्रारेड कॅमेरा उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये 68 whr बॅटरी देण्यात आली असून एकदा चार्ज केल्यानंतर तेरा तासांपर्यंत व्हिडिओ प्ले चालवू शकतो. म्हणजेच तेरा तासापर्यंत या लॅपटॉपचे चार्जिंग संपत नाही. HP चे सीनियर डायरेक्टर विक्रम बेदी यांनी सांगितलं की, या नवीन HP Pavilion Plus लॅपटॉप युजर्सला हायब्रीड लाईफस्टाईल प्रदान करण्यासाठी डेव्हलप आणि डिझाईन करण्यात आला आहे. त्यासाठी या लॅपटॉप मध्ये I- max मॅक्स हाय डिस्प्ले देण्यात आला आहे आणि या सोबतच स्मार्ट AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनीने HP प्रेझेंट 2.0 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणे देखील सोपे केले आहे. त्यानुसार व्हिडिओ कॉल च्या वेळी यामध्ये ऑटो फ्रेम फंक्शन यूजर चे लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.