टाइम्स मराठी । ऑफिशियल कामासाठी बऱ्याचदा Gmail चा वापर होत असतो. काही महत्वाच्या गोष्टी असतील तर आपण मेल करायला सांगतो. परंतु आता Gmail मध्ये उपलब्ध असलेले एक फीचर बंद करण्यात येणार आहे. बऱ्याच जणांचे इंटरनेट स्लो चालते. त्यांच्याकडे फास्ट इंटरनेट सुविधा नसते. अशावेळी Gmail अकाउंट स्लो इंटरनेटवर देखील स्पीड मध्ये काम करते. परंतु आता स्लो स्पीड मध्ये तुम्ही जीमेल अकाउंट ओपन करू शकणार नाही. Gmail मध्ये उपलब्ध असलेले HTML व्हर्जन आता कंपनीकडून बंद करण्यात येणार आहे. जेणेकरून जीमेलचे HTML व्हर्जन तुम्ही ओपन करू शकणार नाही. जर आता तुम्ही सतत Gmail वापरत असाल तर तुम्हाला फास्ट इंटरनेटची गरज पडेल. आणि तुमचा Gmail स्टॅंडर्ड व्हर्जन मध्ये ओपन होईल.
Gmail चे HTML वर्जन हे Gmail चे संपूर्ण फिचर्स युजर्स ला दाखवत नाही. Gmail ने नुकतेच लॉन्च केलेले काही फीचर देखील या HTML व्हर्जन मध्ये मिळत नसल्यामुळे कंपनीने HTML व्हर्जन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर जेव्हा आपण Gmail चे HTML वर्जन क्रोम इन्स्पेक्ट नेटवर्क वर लोड करतो तेव्हा लोड होण्यासाठी 1200 मिलिसेकंद एवढा वेळ लागतो. परंतु Gmail चे स्टॅंडर्ड व्हर्जन लोड होण्यासाठी फक्त 700 मिलीसेकंद लागतात.
Gmail ने HTML हे वर्जन स्लो ब्राउझरसाठी डिझाईन केले होते. परंतु आता इंटरनेट यूजर साठी कंपनीने फास्ट ब्राउझर लॉन्च केले आहे. आणि इंटरनेट स्पीड देखील प्रचंड वाढल्यामुळे स्लो ब्राउझरची आणि HTML व्हर्जन ची आता गरज भासत नाही. Gmail साठी काही वर्षांपूर्वी स्टँडर्ड वर्जन देखील लाँच करण्यात आले होते. प्रत्येक जण आता स्टॅंडर्ड व्हर्जनचा वापर करतो. यामुळे HTML वर्जन आता ग्राहकांना मिळणार नाही.