Huawei Enjoy 70 स्मार्टफोन लॉन्च; नवीन कॅमेरा मॉड्युलसह उपलब्ध 

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी Huawei ने चिनी मार्केटमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनचे नाव Huawei Enjoy 70 आहे. कंपनीने हा मोबाईल कमी किमतीत लॉन्च केला असून यामध्ये देण्यात आलेले कॅमेरा मॉड्युल नवीन डिझाईन मध्ये  उपलब्ध आहे. कंपनीने हा मोबाईल दोन स्टोरेज वेरीएंट मध्ये लॉन्च केला असून यामध्ये ब्रिलियंट ब्लॅक, स्नोई व्हाईट, एमराल्ड ग्रीन या तीन रंगांचा समावेश आहे. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Huawei Enjoy 70 या मोबाईल मध्ये कंपनीने 6.75 इंच  HD +LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले डियर ड्रॉप नॉच सह येतो. यामध्ये देण्यात आलेल्या डिस्प्ले हा 720×1600 पिक्सल रिझोल्युशन आणि  60 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये  किरीन 710A चिपसेट बसवला आहे. त्याचबरोबर या मोबाईल मध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 22.5 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

कॅमेरा– Huawei Enjoy 70

Huawei Enjoy 70 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यानुसार 50 MP प्रायमरी कॅमेरा, 2 MP मायक्रो लेन्स, सेल्फी साठी 8 MP कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा कॅमेरा हार्मनी ओएस 4 वर काम करतो.

 कनेक्टिव्हिटी फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, ड्युअल सिम 4G, Wifi, ब्लूटूथ, GPS, NFC, USB C port यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. तसेच यामध्ये फिजिकल एन्जॉय एक्स बटन देण्यात आले आहे. या बटनच्या माध्यमातून जास्त वापरण्यात येणारे 9 ॲप्स दिसतात.

किंमत किती?

Huawei Enjoy 70 हा स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज व्हेरीएंट मध्ये लॉन्च केला आहे. त्यानुसार 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 1,199 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 14,154 रुपये आहे.  तसेच 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,399 युआन म्हणजेच 16,454 रुपये आहे.