Huawei MatePad Pro 11 2024 : जगातील पहिला सॅटॅलाइट कम्युनिकेशन फीचर असलेला Tablet लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध

टाइम्स मराठी । HUAWEI कंपनीने सॅटॅलाइट कनेक्टिव्हिटी फीचर्स असलेला जगातील पहिला टॅबलेट लॉन्च केला आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या टॅबलेट चे नाव  Huawei MatePad Pro 11 2024 आहे. कंपनीने हा टॅबलेट चीनमध्ये लॉन्च केला असून फ्री ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा टॅबलेट 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या MATPAD PRO सिरीज चे लेटेस्ट एडिशन आहे. जाणून घेऊया या टॅबलेटचे फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन- Huawei MatePad Pro 11 2024

Huawei MatePad Pro 11 2024 या लेटेस्ट फ्लॅगशिप टॅबलेट मध्ये 11 इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2K म्हणजेच 2560 ×1600 पिक्सेल रिझोल्युशन आणि 600 nits ब्राईटनेस ऑफर करतो. यामध्ये किरीन 9000S प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने या टॅबलेट मध्ये 8300 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

Huawei MatePad Pro 11 2024 या टॅबलेट मध्ये 13 MP प्रायमरी कॅमेरा, 8 MP वाईड अँगल कॅमेरा 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा मध्ये टाईमलॅप्स, बोके, सुपर नाईट सीन, पोट्रेट, प्रो मोड, स्मार्ट फिल्टर, डायनामिक मोड, स्माईली स्नॅपशॉट, व्हॉइस ऍक्टिव्हेटेड फोटो यासारखे  मोड मिळेल. या टॅबलेट मध्ये कनेक्टिव्हिटी साठी WIFI , ब्लूटूथ, USB TYPE C सी यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

स्टोरेज

Huawei MatePad Pro 11 2024 या टॅबलेट मध्ये  कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध केले आहे.  त्यानुसार 12 GB रॅम  256 GB इंटर्नल स्टोरेज, 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज हे दोन व्हेरिएंट देण्यात आले आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 14 वर बेस्ड  हार्मोनीओएस 4 वर चालतो. या टॅबलेट चे वजन फक्त 449 ग्रॅम एवढे असून 5.9  MM थिकनेस देण्यात आली आहे. म्हणजेच हा जास्त स्लिक आणि लाईट वेट टॅबलेट आहे.

किंमत किती?

या टॅबलेटच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, 12 GB रॅम  256 GB  स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 4299 यूआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 50,200 रुपये आहे.  12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरीएंटची किंमत 4799 युआन म्हणजेच  म्हणजेच 56000 रुपये आहे.

काय आहे सॅटॅलाइट कम्युनिकेशन फीचर

Huawei MatePad Pro 11 2024 या टॅबलेट मध्ये मिळणारे सर्वात मोठे फीचर हे टू वे सॅटॅलाइट कम्युनिकेशन आहे. हे फीचर चीनमध्ये  BEIDOU सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टीम वर काम करते. कंपनीने हा लेटेस्ट टॅबलेट हाय ऑर्बिट सॅटेलाईट चा वापर करण्यासाठी डिझाईन केला आहे. यासाठी कोणताही प्रकारचा अँटिना वापरण्यात आलेला नाही. Huawei MatePad Pro 11 2024 या टॅबलेट मध्ये सॅटॅलाइट कम्युनिकेशन इनेबल करण्यासाठी हाय गेन असलेले अल्गोरिदम आणि इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशन प्रोटोकॉल चा वापर करण्यात आला आहे. या फीचर्स चा वापर युजर्स विदाऊट नेटवर्क टेस्ट मेसेज किंवा लोकेशन पाठवण्यास करू शकतात.