Huawei Nova 11 SE : 108 MP कॅमेरा, 4500 mAh बॅटरी; बाजारात आलाय स्टायलिश मोबाईल

टाइम्स मराठी । चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये  धुमाकूळ घालणाऱ्या HUAWEI या ब्रांडने  नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. HUAWEI ही कंपनी भारतात स्मार्टफोन विकत नाही. परंतु ग्लोबल आणि चीन मार्केटमध्ये  या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असतात. या ब्रँड ने Huawei Nova 11 SE हा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. या ब्रँडने हा मोबाईल अतिशय मस्त अशा कॅमेरा कॉलिटी सह अप्रतिम फीचर्स मध्ये आणला आहे. Huawei nova 11 SE हा मोबाईल ३ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.

   

स्पेसिफिकेशन

Huawei Nova 11 SE या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच चा  FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्युशन  आणि 90 hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हा डिस्प्ले OLED पॅनलवर डेव्हलप करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android १३ वर  बेस्ड हार्मनी OS 4 वर काम करतो. या स्मार्टफोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचं झालं तर, 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर डेव्हलप करण्यात आलेले क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर  हे प्रोसेसर यामध्ये देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 2.4 गिगा हर्ट्स क्लॉक स्पीड वर रन करतो .

कॅमेरा– Huawei Nova 11 SE

Huawei Nova 11 SE या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर  F/1.9 अपर्चर असलेला 108 MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच  F/2.2 अपर्चरसह 8 MP अल्ट्रा वाईड अँगल  कॅमेरा यामध्ये उपलब्ध आहे. आणि f/2.4 अपर्चरसह 2 MP मायक्रो सेंसर कॅमेरा यामध्ये देण्यात आले आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी यामध्ये F/2.45 अपर्चारसह 32 मेगापिक्सल कॅमेरा सपोर्ट उपलब्ध आहे.

बॅटरी

Huawei Nova 11 SE या स्मार्टफोनमध्ये  4500 mAh बॅटरी उपलब्ध असून ही बॅटरी  66 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यानुसार ही बॅटरी 32 मिनिटांमध्ये बॅटरी 0 ते 100 टक्के चार्ज होते. या मोबाईल मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, NFC, ब्लूटूथ यासारखे फिचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

Huawei nova 11 SE हा मोबाईल कंपनीने दोन स्टोरेज व्हेरीएंट मध्ये उपलब्ध केला आहे. त्यानुसार यामध्ये  256 GB स्टोरेज आणि 512 GB स्टोरेज उपलब्ध आहे. या सोबतच 256 GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CYN 1999 एवढी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 22,700 रुपये एवढी किंमत आहे. 512 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत CYN 2199  म्हणजेच 25 हजार रुपये आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ग्रीन, व्हाईट आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे.