Hyundai आणि Kia ने 91,000 गाड्या परत मागवल्या; हे आहे मोठं कारण

टाइम्स मराठी । भारतात सर्वात कमी वेळेमध्ये नावारुपास आलेली कोरियन कंपनी किया (Kia) आणि हुंडाई (Hyundai)या दोन्ही कंपन्यांच्या नवीन कार मध्ये आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हुंडाई आणि किया या कंपन्यांकडून कार मालकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांची वाहने घराबाहेर पार्क करावी आणि ती रिपेअर होईपर्यंत कार पासून लांबच राहावे.

   

हुंडाई आणि किया या कंपन्यांकडून 91000 पेक्षा जास्त नवीन गाड्यांसाठी रिकॉल जारी करण्यात आले आहे. या परत मागवलेल्या गाड्यांमध्ये 52000 गाड्या या हुंडाईचा तर 40000 गाड्या या कियाच्या आहे. हुंडाई कंपनीच्या आग लागण्याची शक्यता असलेल्या वाहनांमध्ये 2023-2024 पालीसेड, टक्सन 2023, सोनाटा, एलेन्ट्रा, या वाहनांचा समावेश असून किया कंपनीच्या सेंट्रोस, किया सोल 2023 आणि स्पोर्ट्ज या वाहनांचा समावेश आहे. हुंडाईच्या वाहनांमध्ये 4 प्रॉब्लेम असून किया च्या वाहनांमध्ये 6 प्रॉब्लेम आढळून आले आहे.

हुंडाई आणि किया या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या वाहनांमध्ये स्टॉप अँड गो वेळी पंप असेंबली इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर मध्ये समस्या जाणवली आहे. यामध्ये डॅमेज असल्यामुळे वाहन ओवर हीट होऊन आग लागण्याची शक्यता आहे. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कंपनी कार मालकांना संपर्क करणार असून डीलरच्या माध्यमातून गाडीची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर काही समस्या आढळल्यास ते बदलण्यात येणार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कियाच्या वाहनांमध्ये सहा तांत्रिक बिघाड आढळून आले असून आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर हुंडाईच्या वाहनांमध्ये देखील कियाच्या वाहनांप्रमाणे तांत्रिक बिघाड आढळून आला आहे. हुंडाई कंपनीने कार दुरुस्त होईपर्यंत भाड्याने कार उपलब्ध करून देण्यास डीलरशिपला सांगितले आहे. त्याचबरोबर वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची आग किंवा काहीतरी जळाल्याचा वास आला तर गाडी ड्राईव्ह करू नका. ती कार जवळच्या हुंडाई सेंटरमध्ये घेऊन जा असं अशी विनंती हुंडाईने वाहन मालकांना केली आहे. डिसेंबर महिन्यापासून ग्राहकांच्या कार बद्दल तक्रारी आल्या असल्याचा हुंडाईने सांगितलं आहे. त्याचबरोबर किया ला सुद्धा जून महिन्यामध्ये गाडीमध्ये असलेल्या तांत्रिकी बिघाडाची माहिती मिळाली होती.