नाद खुळा!! नुसत्या आवाजाने सुरु होणार Car; दमदार फीचर्ससह लाँच झाली Hyundai Creta

टाइम्स मराठी : प्रसिद्ध ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hyundai ने आपली Creta Facelift नव्या अपडेटेड व्हर्जन मध्ये बाजारात आणली आहे. या गाडीचे खास वैशिष्ठय म्हणजे ती नुसत्या आवाजाने सुद्धा स्टार्ट होऊ शकते. कंपनीने ही SUV Car 10.99 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. Creta Facelift भारतीय बाजारात Toyota Urban Cruiser Hyrider, Kia Seltos, Skoda Kushaq आणि MG Astor या गाडयांना थेट टक्कर देईल. आज आपण या कारचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

   

Hyundai Creta Facelift च्या नव्या व्हर्जनमध्ये तुम्हाला आधुनिक लुक मिळतो. गाडीच्या पाठीमागील बाजूस, स्प्लिट टेल-लॅम्प सेटअपला जोडणारा LED लाइट बार खूपच आकर्षक आहे. नवीन क्रेटाच्या इंटीरियरमध्ये ट्विंस 10.25-इंच कनेक्टेड स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक मोठे इन्फोटेनमेंट युनिट देण्यात आले आहे. गाडीमध्ये लेग स्पेस आणि शोल्डर स्पेससाठी मोठी जागा तुम्हाला मिळेल, स्पेस त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल.

इंजिन –

नवीन Hyundai Creta मध्ये कंपनीने 3 इंजिन पर्याय दिले आहेत. त्यानुसार तुम्हाला या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन पर्याय मिळेल. या SUV Car मध्ये 4 ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध असतील. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, IVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन), 7-स्पीड DCT (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेबद्दलही विचार केला आहे. त्यानुसार या कार मध्ये 70 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत, त्यापैकी 36 वैशिष्ट्यांचा मानक म्हणून समावेश करण्यात आला आहे. ज्यात सर्व प्रवाशांसाठी 6-एअरबॅग्ज, ESC, VSC, अष्टपैलू डिस्क ब्रेक आणि 3-पॉइंटर सीटबेल्टचा समावेश आहे.

आवाजाने सुरु होणार कार –

या गाडीचे आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती नुसत्या आवाजाने सुरु होती. कंपनीने या कार मध्ये 148 एम्बेडेड व्हॉईस कमांड दिले आहेत. . तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही तुम्ही या कमांड वापरू शकता. याशिवाय ही कार ६२ हिंग्लिश (हिंदी+इंग्रजी) व्हॉईस कमांडला सपोर्ट करते, जसे की- Alexa turn on my car, Alexa start my car. म्हणजेच तुम्ही आता फक्त तुमच्या आवाजाने सुद्धा Hyundai Creta सुरु करू शकता.