5 लाखांत घरी घेऊन या Hyundai Creta; फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध

टाइम्स मराठी । वाहन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीजण सत्यात उतरवतात तर काही जणांकडून शक्य होत नाही. तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु कार खरेदी करण्यासाठी योग्य बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सेकंड हॅन्ड मॉडेल्स बद्दल. भारतात ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hyundai या कंपनीच्या सेकंड हॅन्ड वाहनावर ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही बजेटनुसार वाहन खरेदी करू शकतात. ह्युंदाई कंपनीची Creta ही कंपनीची बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या Hyundai Creta ची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपये आहे. परंतु तुम्ही ऑफरनुसार सेकंड हॅन्ड पद्धतीने कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

   

5.5 लाख रुपयात फायनान्स प्लॅन सोबत मिळेल मॉडेल

सेकंड हॅन्ड ह्युंदाई क्रेटा या कारच्या ऑनलाईन वेबसाईटवर वेगवेगळे ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑनलाइन वेबसाईटवर सेकंड हॅन्ड वाहनांची खरेदी विक्री आणि लिस्टिंग केली जाते. ही ऑनलाईन वेबसाईट म्हणजे  OLX. OLX वर नुकताच 2015 चे हुंडाई क्रेटा मॉडेल उपलब्ध आहे. ही फर्स्ट ओनर कार असून 5.5 लाख रुपयांच्या किमतीमध्ये ग्राहक खरेदी करू शकतात. यासोबतच ग्राहकांना या सेकंड हॅन्ड ह्युंदाई क्रेटा सोबत डाऊन पेमेंट असलेला फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

6 लाख रुपयात खरेदी करा ह्युंदाई क्रेटा

OLX सोबतच CARTRADE या वेबसाईटवर देखील  ह्युंदाई क्रेटा लिस्ट करण्यात आली आहे. या वेबसाईटवर दिल्ली रजिस्ट्रेशन असलेले 2016 चे मॉडेल लिस्ट करण्यात आले. या कारची  सेकंड ओनरशिप आहे. ही सेकंड हॅन्ड ह्युंदाई क्रेटा 6 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. यासोबतच लोन सुविधा देखील देण्यात येणार आहे.

7.5  लाख रुपयांमध्ये हुंडाई क्रेटा

सेकंड हॅन्ड ह्युंदाई क्रेटा हे मॉडेल  DROOM या वेबसाईटवर  देखील लिस्ट करण्यात आले. या वेबसाईटवर हे मॉडेल 2017 चे आहे. ही ह्युंदाई क्रेटा दिल्ली येथे रजिस्ट्रेशन करण्यात आली आहे. ही फर्स्ट ओनर कार असून  7.5 लाख रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करता येईल.