अवघ्या 1 लाखात घरी घेऊन या Hyundai Creta SUV; कुठे आहे ऑफर?

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात SUV Car ची खरेदी केली जात आहे. यासोबतच तुम्ही देखील एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट परफेक्ट बसत नसेल तर हुंडाई क्रेटा या एसयूव्ही कार (Hyundai Creta SUV) कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणलेली आहे. या ऑफरनुसार तुम्ही फक्त एक लाख रुपयांमध्ये ही कार घरी घेऊन जाऊ शकतात.

   

काय आहे ऑफर?

मिळालेल्या माहितीनुसार एसयूव्हीच्या बेस मॉडेल कंपनीने हुंडाई क्रेटा ही एसयूव्ही कार 10,87,000 रुपयांचा एक शोरूम किमतीमध्ये लॉन्च केली होती. आणि ऑन रोड ही किंमत 12,71,253 रुपये एवढी होती. परंतु तुम्ही फायनान्स प्लॅन सह ही कार एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंट वर खरेदी करू शकतात. यामुळे तुम्हाला एकदम 12.71 लाख रुपये भरण्याची गरज पडणार नाही. या फायनान्स प्लॅन नुसार पाच वर्षां पर्यंत म्हणजेच 60 महिन्यांसाठी 11,71,253 रुपयांचे कर्ज देण्यात येते. हे कर्ज 9.8 टक्के वार्षिक व्याज दराने देण्यात येते. तुम्ही ईएमआय च्या माध्यमातून दर महिन्याला 24,771 रुपये हप्ता याप्रमाणे हे लोन फेडू शकता. यासोबतच तुम्हाला कंपनीला एक लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून भरावे लागेल.

Hyundai Creta SUV मायलेज आणि फिचर

Hyundai Creta SUV या कारमध्ये दोन इंजिन ऑप्शन देण्यात आलेले असून ही कार सेफ्टी फीचर्स ने परिपूर्ण आहे. यामध्ये 6 एअर बॅग, इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल,वेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट, डिस्क ब्रेक यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. Hyundai Creta SUV या कारमध्ये 1497 cc इंजन उपलब्ध असून ते 6300 RPM वर 113.18 BHP पावर जनरेट करते. आणि 4500 RPM वर 143.8 NM पीक टॉर्क जनरेट करते. या कार मध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे. ही कार 16.9 kmpl मायलेज देते.