Hyundai ची CNG कार कमी पैशात देतेय दमदार फीचर्स; 27 KM मायलेज

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक जण CNG गाड्यांकडे आपला मोर्चा वळवत आहेत. CNG गाड्या या चालवायला अतिशय परवडणाऱ्या असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा कल हा आपोआपच अशा गाड्यांकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पदक कंपन्या सुद्धा मार्केट मध्ये CNG कार लाँच करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्वत्र सणासुदीचा हंगाम सुरु असून या काळात तुम्ही सुद्धा नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका गाडीचे नाव सांगणार आहोत जी सर्वच बाजूनी तुमच्यासाठी परवडणारी ठरेल. Hyundai Exter असं या गाडीचे नाव असून ही कार तब्बल 27 KM मायलेज देत आहे.

   

Hyundai Exter मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 83 PS पावर आणि 114 NM पिक टॉर्क जनरेट करते . कंपनीने या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी गिअर बॉक्स ऑप्शन दिले आहे. ही कार EX, S, SX, SX (O) आणि SX (O) Connect या पाच व्हेरिएन्ट मध्ये येते. Hyundai Exter मध्ये बसल्यावर आरामदायी सस्पेंशनचा अनुभव तुम्हाला घेता येईल. सध्याची मार्केटची स्थिती पाहून कंपनीने Hyundai Exter CNG व्हेरियन्ट मध्येही आणली आहे. या कारचे CNG इंजिन 69 BHP पॉवर आणि 95.2  nm पिक टॉर्क  जनरेट करते. 1 किलो CNG मध्ये Hyundai ही कार तब्बल 27 किलोमीटर पर्यंत धावू शकते.

किंमत किती?

Hyundai Exter ही SUV 5 ट्रीम ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये EX, S, SX, SX (O), आणि SX (O) हे ऑप्शन्स आहेत. या SUV च्या मॅन्युअल  व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपये ते 9.32 लाख रुपये एवढी आहे. तर AMT मॉडेलची किंमत 7.97 लाख ते दहा लाख रुपये एवढी आहे. तसेच Hyundai Exter च्या CNG मॉडेलमधील S ची किंमत 8.24 रुपये आणि SX (O) ची किंमत 8.97 रुपये एवढी आहे.