टाइम्स मराठी । दक्षिण कोरिया ऑटो निर्माता कंपनी Hyundai ने नुकतीच भारतीय बाजारात Exter मायक्रो SUV लॉन्च केली. ग्राहकांकडून ह्युंदाईच्या या नवीन Exter SUV व्ही ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या SUV ची 50 हजार पेक्षा जास्त ग्राहकांनी बुकिंग केली आहे. यामुळे या SUV चा वेटिंग पिरियड जास्त मोठा आहे. त्याच नुसार आपण आज जाणून घेणार आहोत या एसयूव्ही चा वेटिंग पीरियड कधी पर्यंत आहे आणि या गाडीमध्ये नेमकं काय खास आहे.
Hyundai Exter ही SUV 5 ट्रीम ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये EX, S, SX, SX (O), आणि SX (O) हे ऑप्शन्स आहेत. या एसयूव्हीच्या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपये ते 9.32 लाख रुपये एवढी आहे. तसेच AMT मॉडेल ची किंमत 7.97 लाख ते दहा लाख रुपये एवढी आहे. या SUV मध्ये २ सीएनजी मॉडेल देखील उपलब्ध असून यातील S ची किंमत 8.24 रुपये आणि SX(O) ची किंमत 8.97 रुपये एवढी आहे.
इंजिन –
Hyundai Exter या एसयुव्ही मध्ये 1.2 L चार सिलेंडर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजन 83 bHP पावर आणि 114 NM पिक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिन सोबत पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड एएमटी गिअर बॉक्स ऑप्शन दिले आहे. Hyundai Exter च्या CNG व्हेरिएंट मध्ये हे इंजिन 69 BHP पावर आणि 95.2 nm पिक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या अँटी लेवल व्हेरिएंट मध्ये AMT गिअर बॉक्स देण्यात आलेला नाही.
Hyundai Exter SUV ला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. त्यामुळे या SUV चा वेटिंग पीरियड जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रो शहरांमध्ये या SUV ची मागणी मोठ्या प्रमाणात असून वेटिंग पीरियड देखील त्याचप्रमाणे आहे. मायक्रो एसयूव्ही च्या वेटिंग पिरियड बद्दल बोलायचं झालं तर बेंगलोर मध्ये आठ महिने वेटिंग पिरियड सुरू आहे. यासोबतच दिल्ली चेन्नई हैदराबाद मध्ये चार महिने वेटिंग पीरियड देण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये तीन महिने ग्राहकांना या एसयूव्हीची वाट बघावी लागणार आहे.