Hyundai Flying Car : Hyundai ने आणली Flying Car; पहा भारतात कधी होणार लाँच?

Hyundai Flying Car । आपण कार खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेले वेगवेगळे फीचर्स बघतो. कारचे मायलेज, रेंज, ब्रेक या सर्व गोष्टी आपण बघितल्यानंतर आवडल्यास काय खरेदी करत असतो. परंतु आता कार खरेदी करण्यासाठी जाताना आपल्याला इलेक्ट्रिक कार हवी की फ्लाईंग कार हवी हा विचार करावा लागणार आहे. लवकरच अशी वेळ येणार आहे ज्यामुळे लांब प्रवासाला जाण्यासाठी विमानाची गरज पडणार नाही. विमाना ऐवजी फ्लाईंग कार नेच आपण प्रवास करू. हे स्वप्न नसून लवकर सत्यात उतरणार आहे.

   

साऊथ कोरियन का निर्माता कंपनी हुंडाई ने अशी कार बनवली आहे, जी बाकीच्या ऑटो निर्माता कंपन्यांना हैराण करून सोडेल. हुंडाईने नवीन दोन कन्सेप्ट एकत्र करून फ्लाईंग कार (Hyundai Flying Car) बनवली आहे. आणि आश्चर्यकारक म्हणजे ही कार डिटैचेबल आहे. म्हणजेच ही कार दोन भागात विभागली जाते. सविस्तर सांगायचं झालं तर या कार मध्ये ड्रोन देण्यात आलेले आहे. ही कार फक्त रस्त्यावरच नाही तर हवेमध्ये देखील आरामात उडू शकेल. यासाठी हुंडाईने या डिझाईनसाठी यूएस ट्रेडमार्क ऑफिस कडे पेटंट साठी एप्लीकेशन देखील दिले आहे.

ह्युंदाईच्या मते, रस्त्यावर चालणाऱ्या कार्स आणि हवेत उडणाऱ्या फ्लाईंग कार्स मध्ये वेगवेगळ्या मर्यादा आहेत. पण त्यांनी वापरलेली ही आयडिया सर्व समस्या सोडवते. त्यांच्या मते त्यांनी बनवलेली ही कार रस्त्यावर व्यवस्थित चालते आणि हवेत देखील व्यवस्थित प्रवास करू शकते. यामध्ये बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटार चा वापर करण्यात येणार आहे. तरीही हुंदाईची हायड्रोजन आणि सिंथेटिक इंधनाचा पर्याय शोधत आहे.

कधी होणार लाँच ? (Hyundai Flying Car)

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार भारतीय बाजारामध्ये 2025 च्या शेवटी लॉन्च करण्यात येऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये 100kmph पेक्षा जास्त स्पीड ही कार देऊ शकते. कंपनीने यामध्ये सेफ्टी फीचर्स देणार असून यात एमर्जेंसी साठी बैलीस्टिक पॅराशुट देण्यात आला आहे. यापूर्वी फ्लाईंग कार स्वीडन मधील जेटसन या कंपनीने लॉन्च केली होती. ही कार दिसायला मोठ्या ड्रोन प्रमाणे होती. याची किंमत 98000 डॉलर म्हणजेच 80.19 लाख रुपये एवढी आहे.