Hyundai ने ग्राहकांसाठी सुरू केले स्पेशल सर्विस कॅम्प

टाइम्स मराठी । Hyundai मोटर्स वाहन निर्माता कंपनीचे वाहन भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. आता Hyundai मोटर्सने एक नवीन सर्विस कॅम्प सुरू केला आहे. या नवीन सर्विस कॅम्पच्या माध्यमातून Hyundai कंपनीच्या वाहन मालकासाठी कंपनीकडून वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या नवीन सर्विस कॅम्पचे नाव स्मार्ट केअर क्लिनिक आहे. ही सर्विस  20 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार Hyundai कंपनीच्या वाहनांचे मालक 1500 पेक्षा जास्त ह्युंदाई सर्व्हिस केंद्रांवर मिळणाऱ्या सर्विसवर सूट मिळवू शकतात. 

   

काय आहे ऑफर्स

Hyundai च्या स्मार्ट केअर क्लिनिक सर्विस कॅम्प मध्ये  Hyundai कंपनीकडून फ्री मध्ये 70 पॉईंट चेकअप, मेकॅनिकल पार्टस वर 10% सूट मिळवू शकतात. यासोबतच व्हिल अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वर 15% सूट, लेबर सर्विसेस वर 20% सूट देण्यात येत आहे. यासोबतच ह्युंदाईच्या कारमध्ये एक्स्टर्नल अँड इंटरनल सर्विसेस वर  20% सूट, ड्राय वॉश वर 20% सूट मिळणार आहे. यासोबतच Shell India च्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त  ग्राहकांना रिवॉर्ड  जिंकण्याचा चान्स मिळेल.

काय म्हणाले Hyundai Motors चे CEO –

ह्युंदाई कंपनीच्या स्मार्ट केअर क्लिनिक या सर्विस बाबत ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडचे CEO तरुण गर्ग यांनी माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, ” 2023 हे वर्ष ह्युंदाई मोटरसाठी अप्रतिम ठरले.  ह्युंदाई कंपनीची एक्स्टर या SUV ने व्यवसायाला पुढे नेले आहे. या CEO बद्दल 100,000 बुकिंग सोबतच अप्रतिम प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. CEO च्या  IONIQ 5 या कारला देखील 2023 चा सुरवातीस लॉन्चिंग पासून  ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद दिसून आला. लॉन्चिंग पासून आतापर्यंत IONIQ 5 कारची 1000 पेक्षा जास्त वाहन विक्री करण्यात आली.”

ग्राहकांसाठी ह्युंदाई हा ग्राहक केंद्र ब्रँड

ह्युंदाई कंपनीची स्मार्ट केअर क्लिनिक सर्विस या अभियानाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. या सर्विसेस मुळे ग्राहकांना बऱ्याच प्रकारचे लाभ मिळतील. आमच्या प्रिय ग्राहकांसाठी ह्युंदाई हा एक ग्राहक केंद्र ब्रँड राहिला आहे. हा ब्रँड स्थिरतेसोबतच विक्री नंतरचा अप्रतिम अनुभव ऑफर करतो. असं  ह्युंदाई लिमिटेड चे सीईओ तरुण गर्ग यांनी सांगितले.