Hyundai i20 N Line भारतात विक्रीसाठी खुली; पहा फीचर्स काय मिळतात अन किंमत किती?

टाइम्स मराठी । दक्षिण कोरियाई ऑटो निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सची Hyundai i20 N Line भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ह्युंदाई कंपनीच्या या मॉडेलमध्ये दोन ट्रिम्स N6 आणि N8 यांचा देखील समावेश आहे. ह्युंदाईच्या Hyundai i20 N Line च्या N6 या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9 लाख 99 हजार 490 एवढी आहे. यासोबतच N6 DCT व्हेरियंटची किंमत 11 लाख 09, 900 एवढी असून मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेल N8 ची किंमत 12 लाख 31 हजार 900 रुपये एवढी आहे.

   

इंटरियर फीचर्स

Hyundai i20 N Line च्या इंटरियर मध्ये स्पोर्टी ब्लॅक इंटरियर देण्यात आले आहे. ज्यामुळे गाडीला स्फोर्टी लुक येतो. या कारच्या केबिनमध्ये तीन स्पोक स्टिअरिंग व्हील, नवीन इन्फॉटेनमेंट सिस्टीम, गिअर शिफ्ट, आणि लेदर सीट देण्यात आली आहे. या कार मध्ये पाच सिंगल टोन आणि दोन ड्युअल टोन कलर ऑप्शन देण्यात आले आहे. त्यापैकी एक नवीन एबीस ब्लॅक शेड, ॲटलास व्हाईट, टायटन ग्रे, थंडर ब्ल्यू, स्टार्री नाईट, एबीस ब्लॅक रूफ सह एटलस वाईट आणि ब्लॅक, ब्लु रुफ या रंगाचा समावेश आहे.

स्पेसिफिकेशन– Hyundai i20 N Line

Hyundai i20 N Line मध्ये 1.0L टर्बो GDi पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड DCT गिअर बॉक्स देण्यात आले असून 6000 rpm वर 120 PS पावर जनरेट करते. आणि 1500 ते 4000 RPM वर 172 NM पिक टॉर्क जनरेट करते.

अन्य फिचर्स

Hyundai i20 N Line मध्ये 60 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध असून 10 भाषांना सपोर्ट करणारा मल्टीमीडिया सिस्टीम देखील या कार मध्ये देण्यात आली आहे. या कारमध्ये मॅपिंग इन्फोटेनमेंट सह OTA अपडेट, 52 इंग्लिश वोईस कमांड, 127 एम्बेड्डेड VR कमांड, सी टाईप चार्जिंग स्लॉट, सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, व्हिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, सीट बेल्ट सह 3 पॉईंट सीट बेल्ट रिमाइंडर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, डिस्क ब्रेक, हेड लॅम्प यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.