Hyundai मोटर्सची Facelifted i20 कार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

TIMES MARATHI | कार बाजारात सध्या हुंडाई मोटर्स कंपनी धुमाकूळ घालताना दिसत आहे. Hyundai Motorकडून नुकतीच Facelifted i20 कार लाँच करण्यात आली आहे. आज प्रीमियम हॅचबॅक i20 चे फेसलिफ्ट मॉडेल Hyundai ने भारतात लाँच केले आहे. Facelifted i20 चे हे नविन मॉडेल सर्वांना भुरळ पाडत आहे. या नविन मॉडेलला बाजारात मोठी मागणी होत आहे. तसेच लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी या कारचे बुकिंग फुल झाले आहे. आज आपण याच Facelifted i20 मॉडेलची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

   

खास वैशिष्ट्ये

Facelifted मॉडेल नवीन 2D Hyundai लोगोसह प्रदर्शित करण्यात आले आहे. या मॉडेलचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पॅरामेट्रिक डिझाइन घटकांसह नवीन एलईडी हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिलमध्ये एम्बेड केलेले डीआरएल होय. यामुळे Facelifted ला एक नविन रूप मिळाले आहे. या मॉडेलच्या इंटिरिअरला ड्युअल टोन ग्रे आणि ब्लॅक इंटीरियरसह सेमी लेदरेट सीट डिझाईन आणि लेदरेट अप्लाईड डोअर देण्यात आले आहे. तसेच, डी-कट स्टीयरिंग व्हील आणि BOSE प्रीमियम 7 स्पीकर सिस्टम आणि सी-टाइप यूएसबी चार्जरची सुविधा देखील कारमध्ये उपलब्ध आहे.

6 एअरबॅग्ज आणि 2 ड्युअल-टोन कलर

इतकेच नव्हे तर, हुंडाईचा या नवीन कारमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) , व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM),3-पॉइंट सीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही कार Amazon Grey सह 6 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या कारच्या लाईन अपमधून टर्बो पेट्रोल काढून टाकण्यात आले आहे. कारण, फक्त 1.2 पेट्रोल इंजिन आहे. या 1.2 पेट्रोल इंजिनमध्ये Idle Stop and Go असे स्मार्ट फीचर देण्यात आले आहेत.

किंमत

Facelifted i20 कार सर्वांच्या आवडीस पडत आहे. म्हणून याची किंमत आपण पाहिला गेलो तर, एक्स-शोरूमची किंमत 6.99 लाख इतकी आहे. तर टॉप-एंड 1.2L iVT ट्रान्समिशन मॉडेल ची किंमत 11 लाख रुपये आहे. ही कार i20 मारुती सुझुकी बलेनो आणि टाटा अल्ट्रोझशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.