Hyundai ने अपडेटेड फीचर्ससह लॉन्च केली Tucson; किंमत किती?

टाइम्स मराठी | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये Hyundai कंपनीने नवीन SUV सादर केली आहे. या SUV चे नाव  HYUNDAI Tucson 2024 असं आहे. कंपनी ही SUV भारतीय बाजारपेठेत पुढच्या वर्षी लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे. या SUV मध्ये बरेच बदल करण्यात आले असून यामध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स देखील उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने या SUV च्या डिझेल इंजिनसह स्नो, मड, सॅन्ड हे मोड उपलब्ध केले असून  इको, स्पोर्ट, आणि नॉर्मल हे तीन ड्रायव्हिंग ऑप्शन उपलब्ध केले आहे. आज आपण जाणून घेऊया या कारचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

एक्स्टर्नल डिझाईन

HYUNDAI Tucson 2024 या एसयूव्हीच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर, एक्स्टर्नल म्हणजेच बाहेरील साईडने या SUV मध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. या कारच्या समोर 3D डिझाईन बघायला मिळते. या ग्रीलच्या आत मध्ये LED DRL जास्त प्लेन आणि  स्मूद वाटतात. टक्सन फेसलिफ्ट मध्ये ग्रील, LED डेटाईम रनिंग लॅम्प, स्कीड प्लेट  एलिमेंट्स सह नवीन बंपर मिळते. कंपनीने या ग्रीलच्या आकारात बदल केला आहे. या SUVमध्ये देण्यात आलेले LED  हे दिवस-रात्र चालू असतात. हे LED डे टाईम रनिंग लॅम्प ग्रीलच्या किनाऱ्यांना फ्रेम तयार करतात. परंतु हे ग्रील आणखीन आयताकार बनवण्यासाठी पुन्हा डिझाईन करण्यात आले आहे. या SUV च्या दोन्ही बाजूंनी कमी DRL पॉड मिळतात.

इंटरनल डिझाईन

HYUNDAI Tucson 2024 या SUV च्या इंटेरियर मध्ये, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इन्फोटेनमेंट सिस्टीम या दोन्हींसाठी ट्वीन 12.3 इंच डिस्प्ले लावण्यात आले आहे. केबिन मध्ये उपलब्ध असलेल्या डॅशबोर्ड ला नवीन एअर कंडिशनर वेंट आणि हॅप्टिक कंट्रोल सह नवीन सेंटर कन्सोल लेआउट सह पूर्णपणे नवीन डिझाईन करण्यात आले आहे. नवीन तीन स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या कॉलम वर एक गिअर शिफ्ट देण्यात आले आहे.

इंजिन

HYUNDAI Tucson 2024 या SUV मध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या इंजिनचा अजून खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु यामध्ये 2 लिटर पेट्रोल आणि डिझेल  2 इंजिन उपलब्ध करण्यात येऊ शकतात. 2 लिटर पेट्रोल इंजन हे नैसर्गिकरित्या एक्सपिरेटेड असेल. या इंजिन सोबत 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडण्यात येऊ शकते. हे इंजिन 154 BHP पावर आणि 192 nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन  म्हणजेच 2 लिटर डिझेल इंजिन  184 bhp पावर आणि 416 nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे.